Mrs. who left for her village in Madhya Pradesh with her mother-in-law and father-in-law. Lalita SYSTEM
नाशिक

Nashik : वाट चुकलेल्या महिलेची पोलिसांकडून मूळ गावी रवानगी

सकाळ वृत्तसेवा

सिडको (जि. नाशिक) : मानसिक संतुलन बिघडल्याने मध्य प्रदेशातून थेट नाशिकमधील पाथर्डी फाटा भागात मिळून आलेल्या विवाहितेला अंबड पोलिसांनी मंगळवारी (ता. १३) तिच्या नातेवाइकांकडे सुपूर्द केले. सायंकाळी उपनिरीक्षक संदीप पवार यांना ही महिला पाथर्डी फाटा येथे एकाकी फिरताना दिसली. त्यांनी सुरक्षिततेच्या कारणासाठी तिला पोलिस ठाण्यात आणले. मात्र ती केवळ ललिता आणि दलोदा एवढीच त्रोटक माहिती देत होती. (Missing woman sent to native village by police Nashik News)

वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या आदेशाने या महिलेला महिला आधार आश्रमात पाठवण्यात आले. मात्र, दुसऱ्या दिवशी तेथील संचालकांनी या महिलेने मानसिक संतुलन गमावल्याची शक्यता असून इतरांसाठी धोका आहे, असे कळविले. त्यामुळे पोलिसांनी न्यायालयात तिला नेले असता न्यायालयाने या महिलेवर उपचार करण्याचा आणि तिच्या नातेवाइकांचा शोध घेण्यास सांगितले.

त्यानुसार अंबड पोलिस ठाण्याच्या महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करत जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. दरम्यान उपनिरीक्षक पवार यांनी मध्य प्रदेशातील दलोदा भागात संपर्क साधून महिलेने दिलेल्या त्रोटक माहितीचे विश्लेषण करून तेथे शोध घेण्यास सुरवात केली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिच्या सासरच्या मंडळींचा शोध लागला.

दुपारी सौ ललिता हिच्या सासू, सासऱ्‍यांना येथे बोलावून घेत वरिष्ठ निरीक्षक देशमुख, निरीक्षक नंदन बगाडे, श्रीकांत निंबाळकर आदींच्या उपस्थितीत तिला तिच्या गावाकडे रवाना करण्यात आले. दरम्यानच्या काळात पोलिस ठाण्याच्या महिला कर्मचाऱ्यांनी आणि इतर कर्मचाऱ्यांनीदेखील इतर कार्यभार सांभाळत या महिलेची आवश्यक ती काळजी घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं निधन, वयाच्या ४८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Jalgaon News : पाचोरात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार, २५० गुरे वाहून गेली, असंख्य गावे पाण्याखाली

Hockey Tournament: 'चीनमधील स्पर्धेत सातारकर खेळाडूंची चमकदार कामगिरी': हॉकीपटू वैष्णवी, ऋतुजाचे ‘चक दे इंडिया’; भारतीय संघाचे यश

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2025

Suryakumar Yadav : खिलाडूवृत्तीपेक्षा भावना महत्त्वाच्या; हस्तांदोलन टाळण्यावरून सूर्यकुमारचे स्पष्ट मत, नेमकं काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT