dilip bankar2.png 
नाशिक

'ज्या शेतकऱ्यांचे द्राक्षे बाकी आहेत, त्यांनी बेदाणा निर्मिती करावी!' - आमदार दिलीप बनकर

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (दिक्षी) निफाड तालुक्‍यातील ज्या शेतकऱ्यांचे द्राक्षे बाकी आहेत, त्यांनी बेदाणा निर्मिती करावी, असे आवाहन आमदार दिलीप बनकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे. बेदाणा निर्मितीसाठी लागणारे मटेरियल जास्त भावात विक्री करत असल्यास मला संपर्क करा, असे आवाहन आमदार बनकर यांनी केले.

हीच परिस्थिती राहिली तर साठवलेला माल विक्री करणे मुश्‍कील

निफाड तालुक्‍यात शिल्लक द्राक्षांची विक्री कशी करावी, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केला जात असून, एक्‍स्पोर्ट द्राक्षबागांसाठी ट्रान्स्पोर्ट सुविधा देणे, शेतीमाल वाहतूक वाहनांना पास देत आहेत. परंतु द्राक्षे परराज्यात विक्रीस पाठवूनही ग्राहकच नसल्याने व्यापारी द्राक्ष खरेदी करत नाहीत. द्राक्ष नाशवंत आहेत. त्यामुळे तत्काळ विक्री होणे गरजेचे आहे. निफाड तालुक्‍यातील कोल्ड स्टोअरही पूर्ण क्षमतेने भरले आहे. हीच परिस्थिती राहिली तर साठवलेला माल विक्री करणे मुश्‍कील होईल. यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या घरीच द्राक्षांपासून बेदाणे तयार करावेत. यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याची माहितीही आमदार बनकर यांनी दिली. 

बेदाणा निर्मितीसाठी लागणारे पोटॅशियम कार्बोनेट, डिपिंग ऑइल, गंधक आदी पिंपळगाव बसवंत येथे उपलब्ध करून दिल्याची माहितीही त्यांनी दिली. बेदाणा निर्मितीसाठी लागणारे मटेरियल जास्त भावात विक्री करत असल्यास मला संपर्क करा, असे आवाहन आमदार बनकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT