hiraman khoskar.jpg 
नाशिक

भावली धरणातून शहापूरला पाणी देण्यास आमदारांचा विरोध...कारण..

पोपट गंवादे

नाशिक : (इगतपुरी) भावली धरणातून शहापूरला पाणी देण्यास आमदार हिरामण खोसकर यांनी विरोध दर्शविला. मुंबईत मंत्रालयात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. ३०) विभागीय सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होऊन तालुक्यात पावसाचे प्रमाण घटले असून, उन्हाळ्यात तालुक्यातच पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहापूरला भावली धरणातून पाणी देण्यास विरोध नोंदविला.

जमिनी मूळमालकांना परत देण्याचे आदेश

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी २५ जुलैला तालुक्यातील वैतरणा व भावली धरणाला भेट देऊन पाहणी केली होती. स्थानिक प्रकल्पग्रस्तांसोबत चर्चा केली होती. वैतरणा धरणातील अतिरिक्त ओव्हरफ्लोचे पाणी मुकणे धरणात टाकण्याबाबत प्रस्ताव दिला. तसेच नदीजोड प्रकल्पाबाबतचे धोरण याबाबत खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार समीर भुजबळ यांनी श्री. पाटील यांच्यासोबत चर्चा केली होती. या अनुषंगाने सर्व विभागीय सचिव अर्थ व महसूल विभागाची संयुक्त बैठक जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. मंत्रालयात १९७९ मध्ये झालेल्या बैठकीत वैतरणा धरणातील अतिरिक्त जमिनी मूळमालकांना परत देण्याचे आदेश तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. 

शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित 

मात्र हा प्रश्न अद्यापही प्रलंबित राहिल्याने या बैठकीत वैतरणा धरणाच्या लाभक्षेत्राबाहेरील संपादित जमिनी मूळमालक शेतकऱ्यांना परत देण्याचा शासनाचा विचार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दरम्यान, या बैठकीत शहापूरला पाणी देण्यास मात्र स्थानिक आमदार खोसकर यांनी विरोध केला. खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, घोटी कृषी ऊत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोरख बोडके, तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाणे, माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन माळी, संदीप गुळवे, गोकुळ थेटे, शेतकऱ्यांच्या वतीने माजी सरपंच पांडुरंग खातळे, रामदास जमधडे, मिलिंद कुकडे, गोविंद जमदडे, नंदू जमदडे आदी उपस्थित होते. 

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 3.83? आठव्या वेतन आयोगाच्या बैठकीत विवाद! ..तर पगार किती वाढणार?

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT