MLA Khoskar welcomed the drivers by giving roses Nashik Marathi news 
नाशिक

मुंबई महामार्गावर आमदार खोसकर यांची गांधीगिरी; गुलाबपुष्प देऊन वाहनचालकांचे स्वागत 

गोपाळ शिंदे

घोटी ( जि. नाशिक) : मुंबई - नाशिक महामार्गावर पिंपरी फाटा येथे सोमवारी (ता. २५) सकाळी साठेआठला वाहतूक सप्ताहानिमित्त आमदार हिरामण खोसकर यांनी गांधीगिरी करत वाहनचालकांना गुलाबपुष्प देऊन वाहन चालवताना काळजी घ्यावी, असा सल्ला दिला व महामार्ग घोटी केंद्र पोलिसांच्या कार्याचा गौरव केला. 

महामार्ग घोटी केंद्र पोलिसांतर्फे गेल्या आठवड्यापासून वाहतूक सप्ताह साजरा होत आहे. मोक्याच्या ठिकाणी जाऊन नागरिकांचे प्रबोधन केले जात आहे. आग लागलेल्या वाहनातून प्रवाशांना जिवंत बाहेर काढून त्यांना सुरक्षितस्थळी हलविणे, सीटबेल्ट लावणे, वाहतुकीचे नियम पाळणे आदी सूचना व प्रात्यक्षिक केले जात आहे. या कार्याची दखल घेत आमदार खोसकर यांनी वाहतूक सप्ताहाच्या पाचव्या दिवशी गांधीगिरी करत वाहनचालकांना गुलाबपुष्प देत वाहतुकीचे नियम पाळण्याच्या सूचना केल्या. थेट आमदारांच्या हस्ते गुलाबपुष्प स्वीकारताना अनेकांनी सेल्फी घेतल्या.

महामार्ग पोलिसांचे काम कौतुकास्पद

किसान सभेच्या शेतकरी मोर्चाचे यशस्वीपणे वाहतूक नियंत्रण करत सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, याची महामार्ग पोलिसांनी घेतलेली काळजी कौतुकास्पद असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या वेळी महामार्ग घोटी केंद्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता कौस्तुभ पवार, शिवसेना तालुकाप्रमुख भगवान आडोळे, महिंद्रा कंपनीचे व्यवस्थापक टॉम थॉमस, कैलास ढोकणे, सुरक्षा अधिकारी हरीश चौबे, बीकेएस युनियनचे अध्यक्ष अर्जुन भोसले यांसह महामार्ग पोलिस कर्मचारी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Tariffs Policy : इराण युद्धादरम्यान ट्रम्प यांची नवी चाल, औषधांवर लावला १०० % टॅरिफ, न्यायालयाने फटकारल्यानंतरही धोरण कायम

Gadchiroli News : भुकेल्या माओवाद्यांना पोलिस जवानांनी भरवला घास! कांकेरच्या जंगलात बंदुक हरली माणुसकी जिंकली

Abhishek Sharma ची खेळी गाजली, पण वादही पेटला! नेमकं काय घडलं की IPL ने ठोठावला मोठा दंड,KKR सामन्यानंतरचा मोठा ट्विस्ट

Latest Marathi News Live Update : ज्योतिबाचे दर्शन ठरले अखेरचे; पंचगंगा नदीपात्रात पोहताना दुर्गमानवाडचा तरुण बुडाला

IPL 2026: धोनी नसताना चेन्नईची कसोटी; पंजाबविरुद्ध आज सर्वच क्षेत्रांत प्रगती करण्याची गरज, कशी असेल संभावित Playing XI

SCROLL FOR NEXT