president rule  esakal
नाशिक

Presidents Rule : महाराष्ट्रात लागू शकते राष्ट्रपती राजवट? जाणुन घ्या...

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : येत्या काही महिन्यांत राज्यावर राष्ट्रपती राजवट लागू शकते का, असा प्रश्न लोकांच्या मनात आहे. (mla rohit pawar statement about maharashtra Presidents rule nashik news)

भाजपकडून स्‍वतःकडे सत्ता ठेवण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शक्यता असून, त्‍यासाठीच नवीन राज्यपाल आले असल्‍याचे वैयक्‍तिक मत असल्‍याचे मोठे विधान आमदार रोहित पवार यांनी केले.

पोटनिवडणुकांमध्ये मतविभागणीसाठी अपक्षांना रिंगणात उतरवत, दुसरीकडे मतदारांना भाजपकडून पैसेवाटप केले जात असल्‍याची टीका त्‍यांनी केली. युवकांशी संवादाच्या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मध्यावधी निवडणुका लागतील की नाही, हे सांगता येत नाही.

कदाचित लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित होऊ शकतात. परंतु येत्या निवडणुकीत भाजपची पिछेहाट नक्की आहे. नामांतरणाच्‍या मुद्यावर श्री. पवार म्‍हणाले, की आम्‍ही तेव्‍हाच स्‍वागत केले होते. महाविकास आघाडीत तेव्हाच निर्णय झाला होता.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

गोपीचंद पडळकरांच्‍या नगर नामांतरणाबाबतच्‍या ट्विटवर ते म्‍हणाले, की लोकांचे मत जाणून घेतले पाहिजे व राजकारण न करता सर्वांनी एकत्र आले पाहिजे. परंतु केवळ नामांतरणाचा विषय न घेता अन्‍य महत्त्वा‍च्‍या प्रश्‍नांवरही चर्चा झाली पाहिजे.

भाजपच्‍या काही कार्यकर्त्यांना पैसेवाटप करताना पकडले आहे. भाजप किती आर्थिक ताकद लावली आहे, कशा प्रकारे अपक्ष उमेदवारांना मतविभाजणासाठी निवडणुकीत उतरविले हे काही दिवसांत समोर येईलच, असा दावा त्‍यांनी केला.

रोहित पवार म्‍हणाले...

* पहाटेच्‍या शपथविधीवर चर्चेऐवजी नागरिकांच्‍या समस्‍यांवर चर्चा करा

* भाजपकडून सहानुभूतीसाठी सुरू आहे, भावनिक राजकारण

* जातीच्‍या दाखल्याबाबत क्‍लिष्ट प्रक्रिया व्‍हावी सोपी

* नीलेश राणे ट्विटर प्रकरणावर त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा ठेवणार

* भाजपमध्ये निष्टावंतांना डावलले जातेय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patekar : नानाची वाडी झाली सुन्न! सिंहगडाच्या मातीत रमलेला, आणि येथेच विसावला; ग्रामस्थांची भावना

IndiGo Winter Schedule : प्रवाशांना मोठा झटका! बेळगाव-दिल्ली विमानसेवेला 'विंटर' ब्रेक; इंडिगो कंपनीकडून सेवांमध्ये बदल, आता आठवड्यातून तीनच उड्डाणे

Dhruv Rathee Bengaluru Protest : ध्रुव राठी पहिल्यांदाच उतरला रस्त्यावर! बंगळूरमध्ये SIR विरोधात आंदोलन, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी, मोदींवरही सडकून टीका

Latest Marathi News Live Update: अंत्यसंस्कारासाठी उपमुख्यमंत्री शिंदे पोहोचले

Viral Picture : डेल टेक्नॉलॉजीजच्या संस्थापकाच्या पत्नीला सोशल मीडियावर केले ट्रोल; संपत्ती वाचून डोळे पांढरे होतील..!?

SCROLL FOR NEXT