nmc nashik.jpg 
नाशिक

आमदारांची महापालिकेतील मध्यस्थी ठरतेय डोकेदुखी...कसे ते वाचाच

विक्रांत मते

नाशिक : महापालिकेतील पाच वर्षाच्या सत्ता काळातील पहिल्या अडीच वर्षात माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या वांरवार होणाऱ्या हस्तक्षेपामुळे मेटोकुटीला आलेल्या भाजप नगरसेवकांना दुसऱ्या टर्ममध्ये दिलासा मिळेल असे वाटत असतानाच आता मैदान साफ झाल्याने पालिकेच्या सत्तेमध्ये वांरवार मध्यस्थी करण्यात भाजपच्या एका आमदाराचा पुढाकार भाजपच्या महापालिकेतील नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांना सहन होत नसल्याने त्यातून पक्षांतर्गत नाराजी पसरल्याचे चित्र दिसत आहे. 

अंतर्गत हेवेदावेच अधिक चर्चेत

माजी पालकमंत्री गिरीष महाजन यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रारी करण्यासाठी एक गट सरसावला आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच सत्ता मिळालेल्या भाजपचे साडे तीन वर्षे एकमेकांच्या कुरघोडीतच गेल्याने विकास कामांपेक्षा अंतर्गत हेवेदावेच अधिक चर्चेत आले. सन २०१७ ते २०१९ या कालावधी पूर्वचे तत्कालीन आमदार बाळसाहेब सानप यांनी महापालिकेवरील पकड ढिली होऊ दिली नाही. महापौर, उपमहापौर नियुक्तीपासून ते विषय समित्यांचे सभापती नियुक्त करण्यापर्यंत त्यांचा हस्तक्षेप राहिला. महासभेवर कुठले विषय ठेवायचे कुठले मंजूर करायचे कायद्यानुसार महापौरांचा अधिकार असला तरी त्या प्रत्येक विषयामागे बाळासाहेबांचे नाव असायचे. जोपर्यंत सानप सत्तेच्या राजकारणात सक्रिय होते तोपर्यंत मध्य व पश्‍चिमच्या दोन्ही आमदारांना त्यांनी पालिकेच्या राजकारणात येऊ दिले नाही. त्यामुळे महापालिकेत सानप सांगतील तीच दिशा असायची.

राजकीय वर्चस्व संपुष्टात आल्यासारखीच स्थिती

विधानसभा निवडणुकीत सानप यांना उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उभे राहणे, निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शिवसेनेत प्रवेश करणे या घडामोडीत सानप यांचे राजकीय वर्चस्व सध्या संपुष्टात आल्या सारखी स्थिती आहे. तेदेखील शिवसेनेच्या एकाही कार्यक्रमात उपस्थित न राहता. नांदुर नाक्यावरील फार्म हाऊसमध्येच राहणे पसंत करतात. त्यामुळे सानपांचा फॉर्म आता पूर्वीसारखा राहिला नसल्याचे आता उघड बोलले जात आहे. 

आमदारांची मध्यस्थी नाराजीला कारणीभूत 

सानप राजकारणातून साईटपोस्ट झालेच त्याशिवाय भाजपसोबत देखील त्यांचा काही एक संबंध राहीला नसल्याने नुकतेच राज्य पातळीवर मोठे पद मिळालेल्या एका आमदाराची पालिकेच्या कामकाजातील लुडबूड भाजपच्या नगरसेवकांसाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या परस्पर बैठका घेणे, आयुक्तांशी पत्रव्यवहार करणे, पालिकेच्या कामकाजाची परस्पर माहिती मागविणे आदी कारणांमुळे भाजप मध्ये नारजी पसरली आहे. 

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT