नाशिक : (नांदगाव) मला कोरोना झालाय...मोबाईलच्या अँपने तसे दाखविले...असे म्हणत भेदरलेल्या ग्रामीण भागातल्या व्यक्तीने बुधवारी (ता.27) आरोग्य यंत्रणेची चांगलीच धावपळ उडविली. या व्यक्तीने वेहेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील यंत्रणेला फोन केला अन् 108 क्रमांकाची रुग्णवाहिकादेखील दारात आली अन् नंतर...
असा आहे प्रकार
वेहेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राशी निगडित पंचक्रोशीतल्या एका सेवानिवृत्त व्यक्तीने मोबाईलमधील आरोग्य सेतू अँपला आपली कोविड 19 ची चाचणी करून घेतली. त्यासाठीच्या प्रश्नोत्तराच्या क्रमवारी संपल्यावर उत्तर आले, " covid 19 का टेस्ट पॉझिटीव्ह है" अन् ते उत्तर ऐकून त्याच्या अंगाचा अक्षरशा थरकापच उडाला. मोबाईलच्या अधिकृत सरकारी अँपनेच असा निर्णय दिल्याने या भेदरलेल्या व्यक्तीने लगतच्या वेहेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील यंत्रणेला फोन केला. 108 क्रमांकाची रुग्णवाहिका देखील दारात आली. सदर व्यक्तीच्या सुरुवातील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी झाली. कोरोनाचे कुठलेही लक्षण त्याला नसल्याने तसे समजावून सांगितले मात्र त्याचे समाधान होईना.
यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला
त्याला नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयात आणले वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रोहन बोरसे यांनी तपासणी केली त्याचे तपमान 36 अंश सेल्सियस व ऑक्सिजन 99 पातळीवर होता. इतर लक्षणे विचारण्यात आली. घसा खवखवतो का? खोकला आहे का? इत्यादी त्यातून डॉक्टरांनी कोरोनाची लक्षणे नाहीत असे सांगुन सुद्धा व्यक्ती ऐकावयास तयार नव्हती, अनेक पद्धतीने समजावून सांगितले. तालुक्यातले अहवाल दाखवले. तेव्हा कुठे त्याचे समाधान झाले. सकाळी अकरा वाजता सुरु झालेले हे कोरोना नाट्य अखेरीस पाच वाजता संपले अन् आरोग्य यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.