Hydroponic Farming esakal
नाशिक

Hydroponic Farming : हायड्रोपोनिकद्वारे करा भाजीपाल्याची आधुनिक शेती; नाशिकमध्ये या तारखेला प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : हायड्रोपोनिक अर्थात मातीविना भाजीपाला शेती हे तंत्रज्ञान आधुनिक पद्धतीने शेती करण्याची आवड असणाऱ्यांसाठी वरदान ठरू लागले आहे. या तंत्राने लागवड केलेल्या भाजीपाल्याची गुणवत्ता उत्तम असल्याने स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही वाढती मागणी आहे.

अशी ही किफायतशीर हायड्रोपोनिक भाजीपाला शेती कशी करतात, त्यासाठी कोणकोणत्या पायाभूत सुविधा लागतात, या तंत्राने कोणकोणती भाजीपाला पिके घेता येतात, यात यशस्वी कसे व्हावे इ.सर्व बाबींविषयी सखोल मार्गदर्शन करणारे दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण २९ आणि ३० मार्चला सकाळ- ॲग्रोवन संलग्न शैक्षणिक संस्था एसआयआयएलसीतर्फे नाशिक येथील सातपूर सकाळ कार्यालयात आयोजिले आहे.

कार्यशाळेचे विशेष आकर्षण म्हणजे या विषयातील संशोधक तज्ज्ञ यात मार्गदर्शन करणार आहेत. शेतकरी, प्रोफेशनल्स, संशोधक, विद्यार्थी, शेतीविषयक सल्लागार इ.साठी प्रशिक्षण फायदेशीर आहे. ऑनलाइन पद्धतीने आगाऊ नावनोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क ९२८४७ ७४३६३

प्रशिक्षणातील विषय

- हायड्रोपोनिक काय आहे

- विविध पद्धती, प्रकार

- पीकनिहाय सेटअप

- हायड्रोपोनिक, एक्वापोनिक, एइरोपोनिक तंत्र

- आवश्यक साधने, फर्टीगेशन

- पाण्याची गुणवत्ता, आवश्यक अन्नद्रव्ये

- पाण्याचा इसी, पीएच नियंत्रण, खतांचा वापर

प्रशिक्षण दिनांक : ता.२९ आणि ३० मार्च २०२३

ठिकाण : सकाळ कार्यालय, सातपूर एमआयडीसी, त्र्यंबक रोड, नाशिक

वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ५

शुल्क : प्रति व्यक्ती तीन हजार रुपये

नावनोंदणीसाठी संपर्क ९२८४७ ७४३६३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Tallest Ganesha Idol Immersion: भारतातील सर्वात उंच गणपती मूर्तीचे विसर्जन, भक्ती, उत्साह आणि भावनिक निरोपाचा क्षण, पाहा व्हिडिओ

विसर्जन न होताच परतणार गणरायाची मूर्ती, असा निर्णय घेण्यामागची मंडळाची नेमकी भावना काय? जाणून घ्या

Latest Maharashtra News Updates : उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दिली पूरग्रस्त भागांना भेट

Ganpati Visarjan 2025 Live Updates : परळचा महाराजा विसर्जनासाठी मार्गस्थ

Daund Crime : दौंड येथे तरूणाचा निर्घृण खून; चार संशयित आरोपी ताब्यात

SCROLL FOR NEXT