Molestation esakal
नाशिक

Nashik Crime News : अल्पवयीन बालिकेचा विनयभंग; 3 वर्षांचा सश्रम तुरुंगवास

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नऊवर्षीय बालिकेस मोबाईलवर अश्लील चित्रफिती दाखवत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षे सश्रम तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. ही घटना सिन्नर येथील गावात घडली होती. (molestation of minor girl 3 years rigorous imprisonment to suspect nashik Latest Crime News)

गणेश सदाशिव जाधव (२४, रा. टिकोणी गल्ली, सिन्नर) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडितेच्या आईने याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. नऊवर्षीय बालिका ३ ऑक्टोबर २०१५ ला घरात एकटी असताना परिचित असलेल्या आरोपीने घरात घुसून हे कृत्य केले होते. याप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. उपनिरीक्षक टी. एन. आठवले यांनी तपास करून पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.

जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायदंडाधिकारी डी. डी. देशमुख यांच्या कोर्टात हा खटला चालला. या खटल्यात विशेष सरकारी वकील अ‍ॅड. दीपशिखा भिडे यांनी सहा साक्षीदार तपासले. न्यायालयाने फिर्यादी, पंच आणि साक्षीदारांची साक्ष आणि तपास अधिकाऱ्यांनी सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून आरोपीस तीन वर्षे सश्रम तुरुंगवास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT