woman molest by taxi diver.jpg 
नाशिक

रात्री ड्युटीवरून महिला घरी जाताना..वाटेत तिघांनी अडविले..अन् मग....

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : देशात कोरोनाने थैमान घातले असताना लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशातच ग्रीन किंवा ऑरेंज झोनमध्ये काही ठिकाणी नियम शिथिल करण्यात आल्याने कार्यालयेही सुरू करण्यात आले आहेत. अशातच रात्रीच्या वेळेस ड्युटीवरुन घरी जाणार्‍या महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे.

असा घडला प्रकार

जानेवारी महिन्यात पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या संकल्पेतून निर्भया पथकातील महिला पोलिसांनी रात्रीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेडखानी करणाऱ्यांचे थेट स्टिंग ऑपरेशन करून त्यांच्या मुसक्‍या आवळण्यात येत होत्या. पण आता पुन्हा असे प्रकार घडू लागले आहेत.ड्युटीवरुन घरी जाणार्‍या महिलेचा पाठलाग करत तिघांनी तिचा विनयभंग केल्याची घटना जेलरोडवरील पंचक परिसरात शनिवारी (दि.१६) रात्री ९.३० वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी पीडित महिलेने नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल झालेले संशयित

पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी महिला दुचाकीने ड्युटीवरून घराच्या दिशेने येत असताना तीन संशियतांनी त्यांच्या दुचाकीचा पाठलाग केला. तिघांनी महिलेची दुचाकी अडवून त्यांचा विनयभंग केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस.एन. शेळके करत आहेत.निखिल बोराडे (रा. पिंपळपट्टी, बोराडेमळा, जेलरोड ), पृथ्वीराज गायकवाड, उमेश बागुल (पुर्ण नाव पत्ता नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांचे नाव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT