Women, Gita seekers and Gurukula students reciting the Gita at Nashik esakal
नाशिक

Nashik News : गीतापठणाने रामवाडीची सकाळ मंगलमय; राज्यभरातून महिलांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : रूरल ॲन्ड अर्बन इंडिया वेल्‍फेअर असोसिएशनतर्फे सामुदायिक गीता पठणाचा कार्यक्रम उत्‍पत्‍ती एकादशीचे औचित्‍य साधत रविवारी (ता.२०) सकाळी ८ ते २ वेळेत रामवाडीतील श्रध्दा लॉन्स येथे मोठया उत्‍साहात झाला. सामुदायिक पठणाने रविवारी सकाळी रामवाडी परिसरात मंगलमय वातावरण झाले. रम्‍य व प्रसन्नदायी सकाळचा अनुभव नाशिककरांनी घेतला. व्यासपीठावर महंत सुधीर पुजारी, मोरेश्‍वरशास्‍त्री जोशी, महंत अनिकेत शास्‍त्री देशपांडे उपस्‍थित होते. (morning of Ramwadi is auspicious with Gita reading Participation of women from across state Nashik Latest Marathi News)

गीतापठण कार्यक्रमात शेकडो महिलांनी राज्‍यभरातून सहभाग घेतला होता. जवळपास पन्नासहून अधिक महिला पठणात सहभागी झाल्‍या होत्‍या. श्रीमद्‌ भगवत्‌गीता यातून जीवनातील नीतिमूल्ये अतिशय समर्पक रीतीने सांगितली आहेत. तसेच भगवत् ‌गीतेच्या प्रसाराने समाजात सकारात्‍मकता परिणामकारक बदल या दृष्‍टीने सामूहिक गीतापठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

गीतापठणात राज्‍यभरातील महिलांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमात मुंबई, दादर, बुलडाणा, मराठवाड्यासह अन्य ठिकाणहून महिला सहभागी झाल्‍या होत्‍या. तसेच यात गीताप्रेमी महिला व पुरुष, कैलास मठातील पाठशाळेचे विद्यार्थी, त्र्यंबकेश्‍वर येथील मधुकर जोशी यांच्या गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी मोठया उत्‍साहाने सहभाग घेतला होता. श्रीमद् भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक १ ते १८ अध्यायांचे सामुहिक पठण करण्यात आले.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

जीवनाचे सार गीतेत आहे. यामुळे कोणत्‍याही क्षेत्रात कामगिरी बजावताना जीवन सुलभ होण्यासाठी गीतेचा प्रचार व प्रसार होणे आवश्‍यक आहे. जीवन सुलभतेसाठी गीतेचा अभ्‍यास महत्त्वाचा आहे, असा संदेश व्यासपीठावर उपस्‍थित मान्यवरांनी या वेळी दिला. संस्थेतर्फे प्रज्ञा बर्डे व शेखर बर्डे यांनी आभार मानले. महाप्रसाद वाटप करून कार्यक्रमाचा समारोप झाला.

श्रेयो हि ज्ञानमभ्यासाञ्ज्ञानाद्ध्यानं विशिष्यते ।
ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम्‌ ॥ १२-१२ ॥

भावार्थ : मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानापेक्षा मज परमेश्वराच्या स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही सर्व कर्माच्या फळांचा त्याग श्रेष्ठ आहे. कारण त्यागाने ताबडतोब परम शांती मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : मुलुंड येथील क्रीडा संकुलन झालेल्या भ्रष्टाचाराबाबत महाविकास आघाडीचं आंदोलन

मॅरेज मटेरियल असतात या राशीच्या व्यक्ती ; लग्नानंतर उजळेल जोडीदाराचं भाग्य, संसारही होईल सुखाचा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT