corona nashik.png 
नाशिक

नाशिकमधील 'या' परिसरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण...कुठे ते वाचा

विक्रांत मते

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांचा आकडा सात हजारांचा टप्पा गाठत असताना सर्वाधिक रुग्ण हे पंचवटी विभागातच आढळून येत असून जुन व जुलै महिन्यात या विभागात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. त्या खालोखाल पुर्व विभागात कोरोना रुग्णांची आघाडी कायम असल्याने महापालिकेने पुन्हा याच भागावर सर्वाधिक लक्ष केंद्रीत केले आहे.

या विभागातील नागरिक धास्तावले

मृत्युदरात मात्र पूर्व विभागात सर्वांत वर असून त्याखालोखाल पंचवटी विभाग आहे. नाशिक पश्चिम व सातपूर विभागात ईतर विभागांच्या तुलनेत कोरोनाबाधितांचा आकडा सर्वात कमी आहे. सिडको विभागात एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर सातपूर विभागात दुसरा रुग्ण आढळला. एकीकडे पुर्व विभागातील वडाळा गावात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे सिडको व सातपूर विभागाने देखील उचल खाल्ली होती. सिडको विभागात असलेले अंबड भागातील संजीव नगर, सातपूर विभागातील कॉलनी परिसरात एकापाठोपाठ एक रुग्ण आढळून आल्याने या विभागातील नागरिक धास्तावले होते. त्यानंतर मात्र पूर्व व पंचवटी विभागात सर्वाधिक रुग्ण आढळून येऊ लागले.

पूर्व विभागात सर्वाधिक ९४० रुग्णांना डिस्चार्ज

२१ जुलै अखेरपर्यंत पंचवटी व पुर्व विभाग कोरोना संसर्गात कायम आघाडीवर राहीले आहे. पंचवटी विभागात १६९१, पुर्व विभागात १४८८, नाशिकरोड विभागात ८९८, सिडको विभागात ८१४, पश्चिम विभागात ५६९ तर सातपूर विभागात ४२५ रुग्ण आढळून आले. पंचवटी विभागात रुग्ण अधिक असले तरी पूर्व विभागात सर्वाधिक ९४० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर पंचवटी विभागात ७९० रुग्णांवर उपचार करून घरी पाठविण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थिती

- राज्याच्या तुलनेत नाशिक शहरात १.९ टक्के रुग्ण.
- जिल्ह्याच्या तुलनेत शहरात प्रभाव कमी.
- एप्रिल- मे महिन्यात ५१ केसेस.
- जून महिन्यात २०८० तर जुलैत ४३१५ केसेस.
- ५९ टक्के पुरुष तर ४१ टक्के महिला कोरोना बाधित.
- २१-४० वयोगटात २५७९ केसेस, शुन्य ते दहा वयोगटात ३९५ केसेस.
- ११ ते २० वयोगटात ६०२, ४१ ते ६० वयोगटात २०४० केसेस.
- साठ वयापेक्षा अधिक ७३५ वयोवृध्दांना कोरोनाची लागण.
- हायरिस्क ५४,४०५, तर लो रिस्क मध्ये ७२,३६६ नागरिक.
- जुन महिन्यात दररोज १५० तपासणी, जुलैत १२०० पेक्षा अधिक चाचण्या.
- २४, ७०८ तपासण्यांतून २४ टक्के कोरोना बाधित आढळले.
- ८९९ प्रतिबंधित क्षेत्र, ६३३ क्षेत्रे बंद तर २६६ सध्या प्रतिबंधित क्षेत्रे सुरु

(संपादन - किशोरी वाघ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT