Damage to vehicles caused by reckless container drivers here
Damage to vehicles caused by reckless container drivers here esakal
नाशिक

Nashik News: बेधुंद वाहनचालकाने मुंग्यांसारखे चिरडल्या मोटारसायकल अन चारचाकी! 1 ठार, अनेक जखमी

सकाळ वृत्तसेवा

येवला (जि. नाशिक) : कोपरगावकडून आलेल्या आणि मनमाडकडे जाणाऱ्या एका कंटेनर चालकाने शहर हद्दीत अक्षरशा मुंग्या चिरडाव्यात अशा पद्धतीने कंटेनर चालवून मोटरसायकली व चारचाकी वाहनांचे प्रचंड नुकसान केले. (Motorcycles and four wheelers crushed by reckless driver 1 killed many injured at yeola Nashik News)

भर गर्दीतून कंटेनर पळवत नेत असल्याने नागरिकांनी स्वतःचा जीव वाचवत इकडे तिकडे पळ घेतल्याने अनर्थ टळला.मात्र बेधुंद चालणाऱ्या कंटेनर चालकाने वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान केलेच पण एक जण मृत्यू अन पाचहुन अधिक जण जखमी झाले आहेत.

मंगळवारचा आठवडे बाजार असल्याने नगर मनमाड मार्गावरही वाहनांची गर्दी असल्याने रहदारी विंचूर चौफुलीनजिक दोन्ही बाजूनी ठप्प होती. याचवेळी रहदारी ठप्प असतांना नगर- मनमाड मार्गावर मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास येथील विंचूर चौफुलीच्या मागे हा भयानक प्रकार घडला.

कंटेनर (एनएल १,एएफ ५४१५) चालक जणू काही यम होऊनच आल्याचा अनुभव प्रत्यक्षदर्शीनी घेतला.अनेक वाहनाना चिरडत आठ जणांना गंभीर जखमी तर एका मोटरसायकल स्वाराला ठार केले. पोलिसांनी मनमाड मार्गावर पाठलाग करत अनकाई बारीजवळ एक ट्रकला ठोकल्याने कंटेनर पलटी झाल्याने चालकाला ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

कंटेनर चालकाने वाहनांना चिरडत पुढे जात असतांना रहदारीत टरबुजाने भरलेल्या एका उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला सर्वप्रथम पलटी केले तर मारुती ब्रीजाला गाडीलाही चिरडले. यानंतर मोटरसायकल व इतर वाहनांना चिरडत अक्षरशः मनमाडच्या दिशेने पळ काढण्याचा प्रयत्न केला असता यावेळी नागरिकांनी कंटेनरचालकाला अडविण्याचा प्रयत्न केला.

बेधुंद असलेला कंटेनरचालकाने नागरिकांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केला यावेळी भयभीत नागरिकांनी कंटेनर समोरून पळ काढल्याने चिरडलेल्या मोटरसायकलला पुढील दोन्ही चाकांमध्ये घेऊन मनमाडच्या दिशेने फरार झाला.शहरातील बस स्थानकाजवळ एका रिक्षाला ठोकत चालकाला गंभीर जखमी केले.

यानंतर या कंटेनर चालकाने मनमाडच्या दिशेने बेदरकारपणे वाहन चालवत सावरगावच्या पुढे मोटरसायकलस्वाराला चिरडत जागीच ठार केले.यानंतर पुढे जात अनकाई किल्ल्याजवळ ट्रकला कंटेनर ठोकल्याने पलटी झाला.

तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना विंचूर चौफुलीर झालेल्या प्रकाराची माहिती मिळताच काही नागरिकांना बसवत पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी कंटेनरचा पाठलाग केला.

अंकाई बारीत हा कंटेनर पलटी झाल्यानंतर चालकाला पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले.कंटेनर चालकाने दहा ते बारा वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले असून वाहन चालकांना गंभीर जखमी केले आहे जखमींना उपजिल्हा रुग्णालय व खाजगी रुग्णांल्यांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सहाययक पोलीस निरीक्षक नितीन खंडांगळे अधिक तपास करत आहे

*युवकाने गमावला प्राण..

कंटेनर चालक जाफर हुसेन (जम्मू काश्मीर) याच्या या बेधुंदपणामुळे विखरणी येथील रोशन वाघमारे (वय १९) या युवकाला आपला प्राण गमवावा लागला आहे.तसेच अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय व खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.याप्रकरणी पोलिसांनी चालक जाफर याला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT