water bill  esakal
नाशिक

NMC Water bill : पाणीपट्टी देयक वाटपाची वाटचाल खासगीकरणाकडे

सकाळ वृत्तसेवा

NMC Water bill : नागरिकांना वेळेत पाणीपट्टी देयके मिळत नसल्याने थकबाकीचा डोंगर वाढत चालला आहे. महापालिकेने आगाऊ पाणीपट्टी भरण्यासाठी सवलत योजना जाहीर केली असली तरी नागरिकांना हातात देयके प्राप्त न झाल्याने योजनेचा लाभ घेता येत नाही.

परिणामी पाणीपट्टी देयके वाटप करण्यासाठी आता खासगीकरणाचा आधार घेतला जाणार असून, लवकरच आउटसोर्सिंग माध्यमातून देयकांचे वाटप केले जाणार आहे. (Moving towards privatization of NMC water bill payment distribution nashik news)

महापालिकेकडून घर व पाणीपट्टी आगाऊ भरणा करणाऱ्या नागरिकांना कर सवलती जाहीर करण्यात आलेली आहे. आगाऊ घरपट्टी अदा करणाऱ्या करदात्यांना एप्रिल महिन्यात आठ टक्के, मे महिन्यात सहा टक्के, तर जून महिन्यात तीन टक्के कर सवलत जाहीर करण्यात आली आहे.

त्याचबरोबर ऑनलाइन पाणीपट्टी अदा करणाऱ्या नळजोडणीधारकांना वार्षिक एकरक्कम इतर अदा केल्यास एक टक्का किंवा जास्तीत जास्त पाचशे रुपये सवलत जाहीर करण्यात आली आहे. घरपट्टीची देयके नागरिकांना तातडीने प्राप्त झाली.

ज्यांना घरपट्टी हातात मिळाली नाही त्या नागरिकांनी महापालिकेच्या वेबसाइटवरून घरपट्टी प्राप्त करून घेत विशेष सवलत योजनेचा लाभ घेतला. परंतु पाणीपट्टीचे देयके नळजोडणीधारकांना वाटप केल्यानंतर एक महिन्याच्या कालावधीत सवलत मिळणार होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र, योजना सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. अद्यापपर्यंत पाणीपट्टीची देयकांचे वितरण न झाल्याने महापालिकेलाच सवलत योजना गुंडाळावी लागली, अशी स्थिती आहे.

दरम्यान, पाणीपट्टी देयके वाटप करताना आउटसोर्सिंगचा आधार घेतला जाणार आहे. जेणेकरून नागरिकांना वेळेत हातात देयके पडून महापालिकेचा महसूलदेखील तेवढ्या प्रमाणात वाढेल, असा अंदाज यामागे लावला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT