Nashik mp hemant godase
Nashik mp hemant godase 
नाशिक

कोरोनायोद्ध्यांच्या यादीत खासदार गोडसे देशात सहावे, राज्यात पहिल्या स्थानावर 

विक्रांत मते

नाशिक : कोरोनासंसर्गाच्या काळात नागरिकांना चांगल्या दर्जाची वैद्यकीय सेवा देण्यासाठी व उपचारासंदर्भातील उत्तम व्यवस्थापनासाठी विशेष उपाययोजना करणाऱ्या खासदारांच्या कामाचा गुणात्मक अहवाल दिल्ली येथील ‘गव्हर्न आय’ संस्थेने बुधवारी (ता. २३) जाहीर केला. यात खासदार हेमंत गोडसे यांचा देशात सहावा तर, महाराष्ट्रात पहिला क्रमांक आला आहे. 

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण लासलगाव येथे आढळल्यांनतर या संकटांशी सामना करण्यासाठी लोकप्रतिनिधी सरसावले होते. लोकप्रतिनिधींच्या कार्याची ‘गव्हर्न आय’ या संस्थेच्या माध्यमातून गुप्त पद्धतीने सर्वेक्षण करण्यात आले. यात खासदार गोडसे यांना देशभरातील नागरिकांनी अधिकाधिक पसंती दिली. संस्थेतर्फे २४ मार्च ते ३० ऑक्टोबर २०२० दरम्यान खासदारांनी केलेल्या कामाचा सर्वे करण्यात आला. त्यासाठी संस्थेच्या संकेतस्थळावर विशेष नामांकनप्रक्रिया राबविली. त्यातून प्रथम आलेल्या ५० खासदारांची निवड झाली. विशेष पथकांनी गोपनीय पद्धतीने ५० खासदारांच्या मतदारसंघात जाऊन प्रत्यक्ष कोविडशी झुंज देण्यासाठी उभारलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यात आली. ५० खासदारांमधून प्रथम पहिले २५ खासदार निवडण्यात आले. त्यानंतर पथकामार्फत नागरिकांशी संवाद साधण्यात आला. आज ‘गव्हर्न आय’ संस्थेने देशभरातील दहा खासदारांची यादी जाहीर केली. गोडसे यांना ६६ पॉइंट गुणांकन तर २३ हजार ८५३ गुणांची विशेष पसंती मिळाली. 

हे ठरले महत्त्वाचे 
- स्वॅब तपासणीसाठी टेस्टिंग लॅब उभारणीसाठी एक कोटीचा निधी 
- परदेशात अडकलेल्या नागरिकांना मायदेशी परत आणले 
- परराज्यात अडकलेल्यांना नाशिकमध्ये परत आणले 
- रुग्णांना इंजेक्शन, बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, अन्य सुविधा उपलब्ध 
- कोविड रुग्णांच्या विलगीकरणासाठी कोविड सेंटर 
- बिटको रुग्णालयात रुग्णांना जलदगतीने सेवा 
- पायी जाणाऱ्या नागरिकांना अन्नदान 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT