MP Godse urges CM to provide space for farmers to sell agricultural produce in Mumbai nashik news 
नाशिक

शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीसाठी मुंबईत जागा द्यावी, खासदारांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

विनोद बेदरकर

नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील ‘विकेल ते पिकेल’ या योजनेंतर्गत नाशिकसह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालाला विक्रीसाठी शेतकरी गट, तसेच शेतकरी उत्पादन कंपन्यांना मुंबईसह उपनगरांत जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांच्यासह शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्याकडे केली. 

जागा उपलब्ध नसल्यामुळे अडचणी

नाशिक शहर- जिल्ह्यातील शेतमालाला मुंबई, कल्याण, ठाणे, नवी मुंबईसह उपनगरांत मागणी लक्षात घेता जिल्ह्यातील शेतकरी गट, कृषी विज्ञान गट, कृषी विज्ञान मंडळ, ग्रीन फ्रिल्ड ॲग्रो सव्हिर्सेस, नॅचरल फुड्‌स कार्नर प्रोड्युसर कंपन्यांना मुंबईसह परिसरात विक्री जागा उपलब्ध नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो. ही अडचण दूर करण्यासाठी खासदार गोडसे यांनी मुंबई कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्याशी चर्चा केली. 

नाशिकच्या शेतकऱ्यांना मुंबईत जागा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून आलेली ‘विकेल ते पिकेल’ ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची आहे. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांच्या गटांना मुंबईत जागा उपलब्ध होत नसल्याची अडचण खासदार गोडसे यांनी मांडली. शेतकऱ्यांना शेतीमाल थेट ग्राहकांना विक्री करता यावा, यासाठी ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेअंतर्गत नाशिकच्या शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाला मुंबईत जागा उपलब्ध करून द्यावी. यासंदर्भात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण या महापालिका प्रशासनाची बैठक लावणार असल्याचे  डवले यांनी खासदार गोडसे यांना सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Accident : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : मिरज शासकीय रुग्णालयाचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT