While congratulating Tripti Khairnar for being selected as Deputy Superintendent of Land Records, only Khairnar's neighbor Prof. Sambhaji Khairnar etc. esakal
नाशिक

MPSC Success Story : डोंगरेजच्या तृप्तीची अधिकारी पदाला गवसणी! पहिल्याच प्रयत्नात मिळवीले यश

सकाळ वृत्तसेवा

MPSC Success Story : डोंगरेज (ता.बागलाण) येथील मूळ रहिवासी असलेल्या तृप्ती खैरनारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात भूमी अभिलेख उपअधीक्षकपदाला गवसणी घातली.

या यशासह इतर मागास प्रवर्गात तृप्ती हिने राज्यात महिलांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. (MPSC Success Story Dongrej trupti to post of officer Success in first attempt nashik news)

डोंगरेज येथील तृप्ती लहानपणापासून अभ्यासात हुशार होती. तिचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या अभिनव बालविकास मंदिर शाळेत झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण मविप्र संचलित मराठा हायस्कूलमध्ये प्रथम श्रेणीत पूर्ण केले.

बारावीनंतर अभियांत्रिकी (मॅकेनिकल) शाखेत प्रवेश घेतला. पदवीचे शिक्षण घेत असतानाच तृप्तीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेकडे आपले लक्ष केंद्रित केले. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी तिने सातत्यपूर्ण अभ्यास सुरू केला. त्यानंतर राज्यकर निरीक्षक परीक्षेत पूर्व व मुख्य परीक्षेत यश मिळविल्याने तिचा आत्मविश्वास अधिकच वाढला.

तृप्ती हिस पुणे येथील ज्ञानप्रबोधिनी संस्थेचे तिला विशेष मार्गदर्शन लाभले. नामपूर येथील डॉ. प्रशांत हिरे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. संभाजी खैरनार यांची ती कन्या तर भागवतकार संतोष महाराज शास्त्री यांची ती पुतणी आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तिच्या यशाबद्दल डोंगरेजचे सरपंच बापू खैरनार, केवळ खैरनार, महाराजा सोशल फाउंडेशनचे गिरीश पाटील, प्रशांत बैरागी, सुधाकर मोरे, किरण कापडणीस आदींनी तिचा सत्कार केला.

"पहिल्याच प्रयत्नात अधिकारी होऊन आई वडिलांची स्वप्नपूर्ती केली आहे. वडिलांच्या प्रोत्साहनामुळे एमपीएससी परीक्षेत अभूतपूर्व यश संपादन केले आहे. स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा असली तरी, रचनात्मक सातत्यपूर्ण अभ्यास, चिकाटी, मेहनत ही त्रिसूत्री हमखास यशाची गुरुकिल्ली आहे. स्वयं अध्यनाबरोबरच अभ्यासात सातत्य ठेवल्यास हमखास यश मिळू शकते." -तृप्ती खैरनार, भूमी अभिलेख उपअधीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Cyclone Alert After Motha: मोंथा नंतर नवीन चक्रीवादळाचा इशारा! हवामान परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्ह

Sunny Fulmali : झोपडीतून सुवर्णशिखराकडे! लोहगावचा सनी फुलमाळी ठरला खऱ्या अर्थाने ‘गोल्डन बॉय’

Navneet Rana Hospitalized : माजी खासदार नवनीत राणा रूग्णालयात दाखल; २५ दिवस 'बेडरेस्ट' असणार!

Raju Shetty: ''उद्यापासून एकही साखर कारखाना चालवू देणार नाही'' प्रशासनासोबतची शेट्टींची बैठक निष्फळ

PM Modi Meet Indian Women Cricket Team : विश्वविजयी महिला क्रिकेट संघासोबत पंतप्रधान मोदी करणार 'ब्रेकफास्ट'? , भेटीची तारीख ठरली!

SCROLL FOR NEXT