Akshay PAgar esakal
नाशिक

MPSC Success Story: कळमदरीच्या अक्षयची उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाला गवसणी!

सकाळ वृत्तसेवा

MPSC Success Story : मनात जिद्द व चिकाटी असली तर माणसाला कुठलीही गोष्ट अशक्य नसल्याचे कळमदरी (ता. नांदगाव)येथील अक्षय पगार सिद्ध करून दाखविले आहे.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगांतर्गत २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत अक्षयने उपमुख्य कार्यकारी अधिकारी (वर्ग एक) पदाला गवसणी घालत ग्रामीण भागातील मुले देखील उंच भरारी घेऊ शकतात हे दाखवून दिले.

मागील वर्षी पहिल्याच प्रयत्नात अक्षयने पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली होती. (MPSC Success Story Kalamdari Akshay gets post of Deputy Chief Executive Officer nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अक्षयचे प्राथमिक शिक्षण कळमदरी येथील जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण साकोरा येथे रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयात झाले. लहानपणापासून शेतकरी जीवन अनुभवलेल्या पगार कुटुंबीयांनी अक्षयला शिक्षणासाठी प्रेरणा दिली.

केटीएचएम महाविद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर सिंहगड कॉलेज येथे अभियांत्रिकी शिक्षण घेत असतानाच अक्षय स्पर्धा परीक्षेकडे वळला. २०२१ मध्ये एमपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून त्याची निवड उप मुख्य कार्यकारी अधिकारी (वर्ग १) म्हणून झाली. येथील शेतकरी व विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष संजय पगार यांचा तो मुलगा आहे.

"लहानपणापासून सैन्यदलात किंवा प्रशासनात येऊन देशसेवेचे स्वप्न होते. या यशामुळे मनोबल वाढले असून या पुढेही अभ्यास करण्याचा मानस आहे . आजच्या यशाने वडिलांचे स्वप्न पूर्ण केल्याचे समाधान वाटत आहे." - अक्षय पगार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हत्तींच्या कळपाला राजधानी एक्सप्रेसची भीषण धडक, ५ डबे रुळावरून घसरले; ८ हत्तींचा मृत्यू

India T20 World Cup Squad Announcement: शुभमन गिलच्या स्थानाला 'या' खेळाडूकडून धोका; SMAT मध्ये १० सामन्यांत चोपल्यात ५१७ धावा, ५१ चौकार अन् ३३ षटकारांचा पाऊस

Kolhapur Election : कोल्हापूर महापालिकेच्या जागावाटपावर महायुतीत तणाव. मंत्री हसन मुश्रीफ २५ जागांवर ठाम; ३३-३३-१५ फॉर्म्युला अमान्य

Nashik : भावाच्या नावावर बोगस मतदानाचा प्रयत्न, बनावट आधार कार्डमुळे उघड; एकाला घेतलं ताब्यात

Latest Marathi News Live Update : नागपूर महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीची दहा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

SCROLL FOR NEXT