Bikers esakal
नाशिक

MRF Supercross Competition : व्रूमऽऽ.. व्रूमऽऽ..चा थरार! सुपरक्रॉस स्पर्धेत प्रज्ज्वल विश्वनाथ विजयी

सकाळ वृत्तसेवा

MRF Supercross Competition : गॉडस्पीड रेसिंग या संस्थेतर्फे झालेल्या स्पर्धेत एमआरएफ मोग्रीप एफएमएससीआय राष्ट्रीय सुपरक्रॉस विजेतेपद स्पर्धेत टीवीएस पेट्रोनास टीमच्या प्रज्ज्वल विश्वनाथ याने अफलातून रायडींग करत विजेतेपद पटकावले.

सिटी सेंटर मॉलजवळील ठक्कर मैदानावर रविवार (ता. ७) सकाळी व्रूमऽऽ.. व्रूमऽऽ..चा थरार नाशिककरांना अनुभवायला मिळाला. (MRF Supercross Competition thrill Prajwal Vishwanath wins nashik news)

ठक्कर मैदान येथे झालेल्या एमआरएफ मोग्रीप राष्ट्रीय सुपरक्रॉस स्पर्धेती, चित्तथरारक क्षण.

सर्वोत्तम दुचाकी रायडर्स सहभागी असलेल्या या स्पर्धेत ८० स्पर्धकांनी गाड्यांच्या कसरती केल्या. एसएक्स १ या विदेशी बनावटीच्या मोटारसायकलसाठीच्या गटात अटीतटीची लढत बघायला मिळाली.

यात विदेशी बनावटीच्या गाड्या तसेच, देशी गाड्यांचा सहभाग होता. ही स्पर्धा एकूण नऊ गटात झाली. सुपरक्रॉस हा कृत्रिमरीत्या बनवलेल्या मार्गावर वाकदार वळणे व छोटे मोठे उंचवटे बनवलेले असतात.

उंचवट्यावरून उंचच उंच उड्या मारत जाणारे स्पर्धक हा मोठा आकर्षणाचा भाग असतो. या मार्गावर १२ जम्पस्‌, १ टेबलटॉप, १ कट टेबलटॉप असल्यामुळे प्रेक्षकांना अनेक कसरती बघायला मिळाल्या. स्पर्धेचे नियोजन श्‍याम कोठारी, सूरज कुटे यांनी केले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

ठक्कर मैदान येथे झालेल्या एमआरएफ मोग्रीप राष्ट्रीय सुपरक्रॉस स्पर्धेती, चित्तथरारक क्षण.

स्पर्धेचा निकाल

क्लास १ : प्रज्ज्वल विश्वनाथ, ऋग्वेद बारगुजे, श्लोक घोरपडे

क्लास २ : श्लोक घोरपडे, प्रणव बी. के., जय जाधव

क्लास ३ : करणकुमार एम., शैलेश कुमार, सचिन डी.

क्लास ४ : राजेश स्वामी, पुष्कर घोरपडे, पिणेश ठक्कर

क्लास ५ : इम्रान पाशा, सचिन डी., करणकुमार एम.

क्लास ६ : पोमीन व्ही. आर., एल्डहोसे बेंनी, पुष्कर घोरपडे

क्लास ७ : श्लोक घोरपडे, विल्मर व्हॅलेन्टिनो, जितेंद्र सांगावे

क्लास ८ : भैरव सी, सुजन जे, दर्शित चव्हाण

डेमोंस्ट्रेशन क्लास : विस्मय राम, रीड सय्यद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT