MSEDCL bill
MSEDCL bill esakal
नाशिक

अचूक वीजबिल हवंय? कोरोना काळात महावितरणची विशेष सुविधा

संतोष विंचू

येवला (जि.नाशिक) : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे (corona virus second wave) राज्यात सध्या संचारबंदी (lockdown) सुरू आहे. अनेक भाग व सोसायट्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. अशा ठिकाणी महावितरणला मीटर रीडिंग घेणे शक्य न झाल्यास किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात आल्यानंतरही वीजग्राहकांना महावितरणतर्फे विशेष सुविधा देण्यात आली आहे. (MSEDCL facility during Corona period)

कोरोना काळात महावितरणची सुविधा

महावितरणने मोबाईल ॲप व वेबसाइटद्वारे वीजग्राहकांना स्वतःहून मीटर रीडिंग पाठविण्याची सोय उपलब्ध करून दिली आहेच; आता मोबाईल ‘एसएमएस’द्वारेदेखील मीटर रीडिंग पाठविण्याची विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. लॉकडाउन काळात या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. या काळात महावितरणला मीटर रीडिंग घेणे शक्य न झाल्यास किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात आल्यानंतरही वीजग्राहकांना महावितरण मोबाईल ॲप, वेबसाइटद्वारे स्वतःहून मीटर रीडिंग पाठविण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासोबतच महावितरणने आता मोबाईल ‘एसएमएस’द्वारेदेखील ग्राहकांना स्वतःहून मीटर रीडिंग पाठविण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. ज्या ग्राहकांकडे स्मार्टफोन नाही अशा ग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे मीटर रीडिंग पाठविता येणार आहे. त्यासाठी ग्राहकांना दरमहा चार दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

‘एसएमएस’द्वारेदेखील मीटर रीडिंग

प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ तारखेपर्यंत एका निश्‍चित तारखेला लघुदाब वीजजोडणीच्या मीटरचे फोटो रीडिंग घेण्यात येत आहे. महिन्यामध्ये रीडिंगसाठी निश्‍चित केलेली तारीख ग्राहकांच्या वीजबिलांवर नमूद आहे. मीटर क्रमांकदेखील नमूद आहे. रीडिंगच्या या निश्‍चित तारखेच्या एक दिवस आधी महावितरणकडून सर्व ग्राहकांना स्वतःहून रीडिंग पाठविण्याची ‘एसएमएस’द्वारे दरमहा विनंती करण्यात येत आहे. हा मेसेज मिळाल्यापासून चार दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वतःहून मोबाईल अॅप किंवा वेबसाइटद्वारे रीडिंग पाठविता येईल. सोबतच या चार दिवसांमध्ये आता मोबाईल ‘एसएमएस’द्वारेदेखील मीटर रीडिंग पाठविता येणार आहे.

ग्राहक क्रमांकासोबत नोंदणी आवश्यक

‘एसएमएस’द्वारे मीटर रीडिंग पाठविण्यासाठी ग्राहकांनी स्वतःचा मोबाईल क्रमांक हा ग्राहक क्रमांकासोबत नोंदणी केलेला असणे आवश्यक आहे. या नोंदणीकृत मोबाईलवर मीटर रीडिंग पाठविण्याबाबतचा मेसेज प्राप्त झाल्यानंतर चार दिवसांपर्यंत ‘एसएमएस’द्वारे मीटर रीडिंग पाठविणे आवश्यक आहे.

अशी करा नोंद...

वीजग्राहकांनी MREAD<स्पेस><१२ अंकी ग्राहक क्रमांक><स्पेस> असा ‘एसएमएस’ ९९३०३९९३०३ या मोबाईल क्रमांकावर पाठवायचा आहे. उदा. १२ अंकी ग्राहक क्रमांक १२३४५६७८९०१२ हा असल्यास व मीटरचे KWH रीडिंग ८९५० असे असल्यास MREAD १२३४५६७८९०१२ ८९५० या प्रकारचा ‘एसएमएस’ पाठवायचा आहे. चुकीचे व मुदतीनंतर पाठविलेले मीटर रीडिंग स्वीकारण्यात येणार नाही व ‘एसएमएस’द्वारे मीटर रीडिंग पाठविण्याची सोय केवळ कोरोना प्रादुर्भावाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपलब्ध राहणार आहे.

दोन ते तीन मिनिटांचा कालावधी

वीजग्राहकांना स्वतःहून मीटर रीडिंग पाठविण्यासाठी प्रत्येक महिन्यात केवळ दोन ते तीन मिनिटांचा कालावधी लागणार आहे. स्वतःहून रीडिंग पाठविल्यास मीटरकडे व रीडिंगकडे नियमित लक्ष राहील. वीजवापरावरदेखील नियंत्रण राहील. रीडिंगनुसार वीजबिल आल्याची खात्री करता येईल. मीटर सदोष किंवा नादुरुस्त असल्यास त्याची तत्काळ तक्रार करता येईल. मीटर रीडिंग अचानक वाढल्यास त्याची कारणे शोधता येतील. शंकासमाधानासाठी तक्रार करता येईल. या व इतर विविध फायद्यांमुळे वीजग्राहकांनी स्वतःहून दरमहा मीटर रीडिंग पाठवावे. -विनायक इंगळे, उपकार्यकारी अभियंता, येवला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Elections 2024: नगरमध्ये PM मोदींनी लालूंवर सोडले टीकास्त्र! मुस्लिम आरक्षणावरून सुरू झाला वाद, काय म्हणाले?

Ajit Pawar : दत्ता भरणेंचा शिवीगाळ केल्याच्या व्हिडिओ व्हायरल; अजितदादा म्हणतात, हस्तक्षेप केला कारण...

Gold Investment: सोन्याचे भाव भिडले गगनाला.. यंदाच्या अक्षय तृतीयेला सोने खरेदी करावी का? तज्ज्ञ काय सांगतात

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : रायगडमध्ये मतदारांनी मतदानानंतर केलं रक्तदान..

SCROLL FOR NEXT