Sarpanch Dinesh Gaikwad, Sonali Gaikwad worshiping the bus of ST Corporation after it ran for the first time in 75 years of independence at Lavade Bhamer (Baghlan). esakal
नाशिक

Nashik News : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच तळवाडे- भामेरला धावली बस!

सकाळ वृत्तसेवा

नामपूर (जि. नाशिक) : तळवाडे भामेर (ता. बागलाण) गावात स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर पहिल्यांदाच बस धावल्याने ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ, विद्यार्थी आदींच्या आनंदाला पारावर उरला नाही.

काटवन खोऱ्यातील, नामपूर शहरापासून सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या तळवाडे भामेर गावातून मोठ्या संख्‍येने विद्यार्थी शिक्षणासाठी नामपूर, सटाणा, मालेगाव येथे जात असतात.

मात्र गावातून कुठल्या प्रकारची वाहतूक सुविधा उपलब्ध होत नसल्याने मुलांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागत होती. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत होते. गावातून बस धावत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. (MSRTC Bus ran to Talwade Bhamer for first time after independence Nashik News)

त्यामुळे तळवाडे भामेर गावासाठी बससेवा सुरू करावी, या मागणीसाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे (शिंदे गट) लोकनियुक्त सरपंच दिनेश गायकवाड, उपसरपंच दिलीप बोरसे, ग्रामपंचायत पदाधिकारी आदींनी भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष बिंदू शर्मा, राज्य परिवहन महामंडळ विभागाचे आगार व्यवस्थापक श्री. कांबळे, उमेश बिरारी आदींकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा सुरू केला.

याकामी तळवाडे भामेरचे परिवहन अधिकारी विनोद जाधव, राहुल बोरसे आदींचेही सहकार्य लाभले. त्यानंतर तातडीने गावात बस सुरू झाल्याने ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण आहे.

गावात पहिल्यांदा बस आल्यानंतर सरपंच दिनेश गायकवाड, सौ. सुवर्णा गायकवाड यांनी बसचे तसेच चालक, वाहक यांचे पूजन केले. गावात बस आल्यानंतर नारळाच्या झावळ्या, फुगे, फुले आदींनी बस सजविण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंचा माजी आमदारांवर थेट आरोप, म्हणाले...

Maharashtra Latest News Update: माटुंगा पोलिसांच्या थरारक कारवाईत दरोड्यातील मुख्य आरोपी अटक

SCROLL FOR NEXT