Godavari river
Godavari river esakal
नाशिक

गोदावरीत मिसळणरे नाल्यांचे फेरसर्व्हेक्षण

विनोद बेदरकर

नाशिक : महापालिका आयुक्तांनी गोदावरीत मिसळणाऱ्या नाल्यांचे फेरसर्व्हेक्षणाच्या सूचना देत, गोदावरी स्वच्छतेच्या अनुषंगाने दोन महिन्यांत प्रदूषित नाल्याविषयी अहवाल मागितला आहे. त्यानुसार मलनिस्सारण विभागाने सर्वेक्षण सुरू केले आहे.

गोदावरी नदीत मिसळणारे सांडपाणी हा महापालकेच्या दृष्टीने एक मोठी डोकेदुखी आहे. शहरात येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांची प्रदूषित गोदावरीमुळे मोठीच निराशा होते. आयुक्त रमेश पवार यांनी यावर उपाय काढण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. तत्कालीन आणि दीर्घकालीन, अशा दोन टप्प्यांवर प्रयत्न करताना महापालिका आयुक्त पवार यांनी गोदावरी नदीकाठच्या अतिक्रमण काढले आहे.

आता प्रदूषित गोदावरीवर उपाययोजना करण्यासाठी आयुक्तांनी विभागप्रमुखांची बैठक घेऊन त्यात पाणीपुरवठा विभागाचे अभियंता शिवाजीराव चव्हाणके यांच्यावर गोदावरी नदीचे प्रदूषण निर्मूलनाससाठी नाले गोदावरी नदीपात्रात मिसळणार नाही, यासाठी फेरसर्वेक्षणासह उपाययोजना सूचविण्याची जबाबदारी सोपविली. त्यानुसार गोदावरी पात्रात मिसळणारे सांडपाणी नदीपात्रात न सोडता ते बाहेर रिट्रीट करून एमआयडीसीला देण्याच्या अनुषंगाने काय प्रकल्प राबवता येईल, याच्या अभ्यास करण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पहिल्या टप्प्यात गंगापूर मलनिस्सारण केंद्रात गंगापूर ते आनंदवल्लीदरम्यानचे सांडपाणी एकत्रित करून साधारण त्या भागातील १८ एमएलडी सांडपाण्यावर पुर्नप्रक्रिया करण्याचे नियोजन केले आहे.

१० बीओडी पेक्षा कमी

गंगापूर येथील मलनिस्सारण केंद्रात अद्ययावत करताना त्यातून प्रक्रिया केल्यानंतर १० बीओडी शुद्ध झालेले पाणी प्रक्रियायुक्त होईल, असे नियोजन आहे. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या निकषानुसार हे पाणी प्रक्रिया केलेले असेल, असे महापालिका सूत्रांचे म्हणणे आहे. याशिवाय शहरातील गंगापूर ते दसकपर्यंतच्या सगळ्या गोदावरी पात्राची पाहणी करून गोदावरीत मिसळणाऱ्या सर्वच्या सर्व ६७ नाल्यांचे फेरसर्वेक्षण करण्यात येणार आहे.

"गंगापूर मलनिस्सारण केंद्राद्वारे १८ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रियेचे नियोजन आहे. त्यानंतर गोदावरी नदीत मिसळणाऱ्या सगळ्या ६७ नाल्यांचे महापालिकेकडून फेर सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर सांडपाण्यावर पुर्नप्रक्रिया करण्याचे नियोजन आहे."

-शिवाजीराव चव्हाणके , अधीक्षक अभियंता, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT