municipal corporation banned private Corona  testing lab in nashik marathi news
municipal corporation banned private Corona testing lab in nashik marathi news 
नाशिक

..म्हणून कोरोनाच्या 'या' खासगी टेस्टींग लॅबवर घातली बंदी! वाचा सविस्तर

सकाळ वृ्त्तसेवा

नाशिक: शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता दररोज पाचशे ते सहाशेच्या आसपास आढळून येत आहे. एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याच्यावर तत्काळ महापालिका किंवा खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु होतात परंतू त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेवून त्यांची तपासणी करून त्यातील हाय व लो रिस्क अशी वर्गवारी करून उपचार केले जातात यामाध्यमातून वाढत्या कोरोनाची साखळी खंडीत करण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे. परंतू शहरात कोरोना विषाणु तपासणीची मान्यता देण्यात आलेल्या खासगी लॅबकडून पालिकेच्या प्रयत्नांमध्ये अडथळा निर्माण करण्याचे प्रयत्न होत असल्याचा प्रकार समोर आले आहे.

कोरोना प्रादुर्भावाची साखळी खंडीत करण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कोरोना बाधित आढळणाया नागरिकांचा पत्ता रिपोर्ट वर तसेच पालिकेने विकसित केलेल्या आयसीएमआर पोर्टलवर अपलोड करणे बंधकारक असताना

म्हणून बंदी घालण्याचे आदेश

खासगी लॅब मध्ये स्वॅब तपासणी साठी गेल्यानंतर पॉझिटिव्ह किंवा निगेटीव्ह रुग्णांचा रिपोर्ट तयार केला जातो. पॉझिटिव्ह रुग्णांच्या रिपोर्ट मध्ये रुग्णाचे नाव, पत्ता तसेच रिपोर्ट पालिकेच्या आयसीएमआर पोर्टलवर अपलोड करावा लागतो. परंतू खासगी लॅबकडून फक्त नाशिक असा उल्लेख केला जात असल्याने संबंधित रुग्णाचा पत्ता शोधण्यापासून ते कॉन्टॅक्ट ट्रेसिंग शोधण्यापर्यंत अनेक अडचणी येतात त्यामुळे कोरोना प्रादुर्भावाची साखळी खंडीत करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसतं असल्याने पालिकेच्या वैद्यकीय विभागाने अनेकदा नोटीस द्वारे सुचना देवूनही दखल न घेतल्याने अखेरीस पुढील सुचना येईपर्यंत बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. आदेशानंतरही लॅबने चाचण्या घेतल्यास महाराष्ट्र साथरोग प्रतिबंध कायदा १९८७, कोव्हीड उपायोजना २०२० व भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्याचा ईशारा देण्यात आला आहे. 

या पाच लॅबचा समावेश

शहरातील मान्यता देण्यात आलेल्या पाच खासगी लॅबकडून नियमांची पुर्तता केली जात नसल्याने अखेरीस पुढील सुचना येई पर्यंत त्यांच्यावर तपासणी साठी बंदी घालण्याच्या सुचना सोमवारी रात्री उशिरा देण्यात आल्या. दातार, क्रस्ना, इन्फेक्स, थायरोकेअर, एसआरएल या पाच लॅबचा समावेश आहे. 

खासगी लॅब संशयाच्या फेऱ्यात 
खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना अव्वाच्या सव्वा बिले आकारून आर्थिक लुट होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर रुग्णालयांमध्ये लेखा परिक्षक बसविण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आता लॅब कडून लुट सुरु आहे. पॉझिटिव्ह रुग्णांचा रिपोर्ट वर नाव व पत्ता दिल्यास पालिकेच्या वैद्यकीय विभागाल संबंधिताला गाठून त्याच्यावर उपचार करण्याबरोबरचं त्याच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेणे सोपे होवून कोरोनाची साखळी खंडीत करणे शक्य आहे. परंतू दातार, क्रस्ना, इन्फेक्स, थायरोकेअर, एसआरएल या पाच लॅब कडून रिपोर्टवर फक्त नाशिक असा उल्लेख करून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या लपविण्याचा प्रकार होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

संपदान - रोहित कणसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT