Satish Sonawane office vandalized in Nashik
Satish Sonawane office vandalized in Nashik Sakal
नाशिक

नाशिकमध्ये सभागृहनेता सतीश सोनवणे यांच्या कार्यालयाची तोडफोड

राजेंद्र बच्छाव

इंदिरानगर (जि.नाशिक) : बुधवारी (ता.५) दुपारी सभागृहनेता (Municipal House leader) सतीश सोनवणे (Satish Sonawane) यांच्या राजीवनगर येथील संपर्क कार्यालयावर दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने दगड आणि लाठ्याकाठ्यासह धुडगूस घालत कार्यालयाची आणि शासकीय वाहनाची तोडफोड केली. हा सर्व प्रकार स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक तथा शिवसेनेच्या सागर देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केल्याचा आरोप सोनवणे यांनी केला आहे. दरम्यान महापौर सतीश कुलकर्णी (Mayor Satish Kulkarni), शहराध्यक्ष गिरीश पालवे, महेश हिरे, गटनेता जगदीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन करून संबंधितांना तातडीने अटक करण्याची मागणी केली. (Municipal House leader Satish Sonawane office vandalized in Nashik)


याबाबत सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी सागर देशमुख आणि दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने कार्यालयावर दगडफेक सुरू केली. वाहनाचे नुकसान केले. केबल नेटवर्कच्या संगणकांचीदेखील तोडफोड करून जमा झालेले पैसे लुटले. आवाज आल्याने सोनवणे आणि त्यांचे चिरंजीव अनिकेत घरातून बाहेर आले. धुडगूस घातल्यानंतर हा जमाव पळाला. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त सोहेल शेख आणि वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर आले. दरम्यान सोनवणे यांच्या समर्थकांनी आणि नागरिकांनी गर्दी करत संताप व्यक्त केला. महापौर कुलकर्णी यांच्यासह पालवे, गिते, पाटील, हिरेदेखील पोचले. पोलिस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलनाला केले. नगरसेवक मुकेश सहाणे, ॲड. श्‍याम बडोदे, ॲड. अजिंक्य साने, माजी नगरसेवक यशवंत निकुळे, सचिन कुलकर्णी, साहेबराव आव्हाड आदी उपस्थित होते. घटनेचे गांभीर्य ओळखून उपायुक्त विजय खरात येथे पोचून दोन तास चर्चा झाली. संबंधितांवर गुन्हे दाखल झाले असून त्यांना तातडीने अटक करण्याचे आश्वासन उपायुक्त खरात यांनी दिले.


शिवसेनेच्या बॅनर्सची तोडफोड
रविवारी (ता.२) सोनवणे यांच्या कार्यालयावर जाऊन देशमुख आणि त्यांच्या तीन साथीदारांनी शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला होता. याबाबत पोलिसात तक्रारदेखील केली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी रात्री फोनवर देशमुख यांनी पुन्हा शिवीगाळ केल्याचे सोनवणे यांचे म्हणणे आहे. तर सोनवणे आणि त्यांच्या साथीदारांनी देशमुख यांच्या प्रतिष्ठानच्या आणि शिवसेनेच्या बॅनर्सची तोडफोड केली असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे विभाग प्रमुख नीलेश साळुंखे, पवन मटाले, सुयश पाटील, योगेश अलई, आबा पाटील यांनी पोलिसांकडे मंगळवारी (ता.४) निवेदनाद्वारे केली आहे.


चौथ्या वेळेस या गुंडाकडून कार्यालयावर हल्ला झाला आहे. अनेकवेळा पोलिसांना निवेदन दिले, मात्र कोणतीही कारवाई नाही. हे निषेधार्ह आहे. गुंडगिरीचा बंदोबस्त करून शांतताप्रिय नागरिकांचे रक्षण केले पाहिजे.
- सतीश सोनवणे, सभागृह नेते.



इंदिरानगरसारख्या परिसरात या प्रकारची गुंडगिरी कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही. रविवारीच (ता.२) पोलिसांनी कारवाई केली पाहिजे होती. तातडीने संबंधितांना अटक करून कडक कारवाई केली पाहिजे.
- सतीश कुलकर्णी, महापौर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

Gold Rate Today: सोन्या-चांदीची चमक पुन्हा वाढली; काय आहे या वाढीमागचे कारण?

Jalgaon NEET Exam : 40 अंश तापमानात ‘नीट’ परीक्षेने काढला भावी डॉक्टरांचा घाम; पालकांचीही कसोटी

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jonty Rhodes IPL 2024 : बॉल बॉयचा भन्नाट कॅच... टिप्स देणाऱ्या जाँटीने थोपटली पाठ; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT