Corona JN1 Virus esakal
नाशिक

NMC News: कोरोना पार्श्‍वभूमीवर महापालिका सज्ज; आयुक्तांच्या बैठकीत सूचना

केरळ राज्यामध्ये कोरोनाबाधित चार रुग्ण आढळल्यानंतर केंद्र व राज्य सरकारने महापालिकांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या.

सकाळ वृत्तसेवा

NMC News : केरळ राज्यामध्ये कोरोनाबाधित चार रुग्ण आढळल्यानंतर केंद्र व राज्य सरकारने महापालिकांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या.

त्याअनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी वैद्यकीय विभागाची बैठक घेत नाशिक रोड येथील स्व. बाळासाहेब ठाकरे रुग्णालय व जुने नाशिकमधील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. (Municipal Corporation is ready in background of Corona disease nashik news)

एप्रिल २०२० ते मार्च २०२२ या कालावधीमध्ये नाशिक शहरांमध्ये चार लाखांहून अधिक करून बाधित रुग्ण आढळले. तर चार हजारहून अधिक कोरोना रुग्णांचा बळी गेला. त्यानंतर मात्र कोरोना प्रादुर्भाव टप्प्याटप्प्याने कमी होत गेला. कोरोना विषय संपुष्टात आल्याचे मानले जात असतानाच आता दोन वर्षांनी पुन्हा कोरोना हा विषय चर्चेला आला आहे.

केरळ राज्यात कोरोनाचा नवीन व्हेरियंट आढळल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाला अलर्ट दिला आहे. या संदर्भात महापालिकेला सूचना प्राप्त झाल्याने आयुक्त डॉ. करंजकर यांनी बैठक घेत कोरोना संदर्भात आढावा घेतला. रुग्णालयांमध्ये राखीव असलेल्या खाटा, ऑक्सिजन व्यवस्था, औषध साठा या संदर्भात माहिती जाणून घेतली. कोरोना पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये तातडीने जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या.

सर्दी, डोकेदुखी, घसा खवखवणे, ताप यासारखी लक्षणे आढळल्यास वैद्यकीय विभागाला उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. बिटको व डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयामध्ये कोरोना काळामध्ये कक्ष उभारण्यात आला होता. त्याचप्रमाणे ऑक्सिजन प्लांटचीदेखील उभारणी करण्यात आली होती.

या संदर्भात आयुक्तांनी आढावा घेतला. त्याचबरोबर स्व. बाळासाहेब ठाकरे रुग्णालय व झाकिर हुसेन रुग्णालयात विशेष कक्ष सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान केरळमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आढळून आला असला तरी नाशिकमध्ये कोरोनाच्या अद्याप एकही लागण झालेला रुग्ण आढळला नसल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी दिली. कोरोना नियमांची अंमलबजावणी करावी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनदेखील करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT