nashik municipal Corporation 
नाशिक

महापालिकेकडून शहरातील १२० बड्या थकबाकीदारांना नोटिसा; महसूलात अद्यापही ३३ कोटींंचा फरक

विक्रांत मते

नाशिक : मार्चएंडमुळे महसूल वसुलीसाठी सरसावलेल्या महापालिका प्रशासनाने शहरातील १२० बड्या थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीच्या नोटिसा बजावल्या असून, पुढील आठवड्यात कारवाईची व्याप्ती वाढविली जाणार आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत अद्यापही ३३ कोटी रुपये महसूल कमी असल्याने कारवाई सुरू करण्यात आली आहे. 

गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरवात झाली. एप्रिल महिन्यात नाशिक शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. या दरम्यान लॉकडाउन जाहीर करण्यात आला. चार महिन्यांचा लॉकडाउन व पुढे अंशतः लॉकडाउनमुळे महापालिकेच्या घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीवर त्याचा परिणाम झाला. प्रशासनाने वसुलीसाठी अभय योजना सुरू केली. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. मार्च महिन्यात बहुतांश व्यक्तींचा कर भरण्याकडे कल असतो. आर्थिक वर्ष संपण्यास अवघे पंधरा दिवस शिल्लक राहिल्याने महापालिकेने घरपट्टी वसुलीचा आढावा घेतला. थकबाकीसह १६० कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यात १२८ कोटी रुपये चालू वर्षाचे उद्दिष्ट, तर ३२ कोटी रुपये थकबाकी होती. आतापर्यंत थकबाकीसह १०५ कोटी रुपये महसूल प्राप्त झाला आहे. गेल्या वर्षी याच तारखेपर्यंत १३८ कोटी रुपये महसूल घरपट्टीतून मिळाला होता. मागच्या व या वर्षाच्या घरपट्टी महसुलात अद्यापही ३३ कोटी रुपयांचा फरक आहे. आर्थिक वर्ष संपण्यास पंधरा दिवस शिल्लक आहेत. या अखेरच्या दिवसांत फारतर दहा कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होऊ शकतो. त्या मुळे आर्थिक तूट कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. 


मालमत्ता जप्तीची कारवाई 

महसूल प्राप्तीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध कर विभागाने थकबाकीदारांना नोटीस बजावण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत १२० थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, अंतिम नोटीसद्वारे थकबाकी अदा न केल्यास मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाणार असल्याची माहिती कर विभागाचे उपायुक्त प्रदीप चौधरी यांनी दिली.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT