funeral esakal
नाशिक

अंत्यसंस्काराचे वेटिंग टळणार; महापालिका करणार स्वतंत्र ॲप विकसित

महापालिका करणार स्वतंत्र ॲप विकसित

विक्रांत मते

नाशिक : शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना विविध कारणांमुळे मृत्यूच्या प्रमाणातदेखील वाढ झाली आहे. एकीकडे मृत्यूंची संख्या वाढत असताना दुसरीकडे स्मशानभूमीमध्ये (death funeral) अंत्यसंस्कारासाठी वेटिंग (waiting) करण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाइकांना आली आहे. पाच ते सहा तासांच्या प्रतीक्षेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे शहरातील स्मशानभूमीमध्ये जागा आहे की नाही, याची माहिती ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना देण्यासाठी ॲप्लिकेशन (online app) विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ( municipality develop app for Waiting funeral)

अंत्यसंस्काराचे वेटिंग टळणार

चार दिवसांपूर्वीच शहरात दोन लाखांच्या पार कोरोना रुग्णांचा आकडा पोचला आहे. महापालिकेच्या दप्तरी दीड हजार मृत्यूंची नोंद झाल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात शहरात मृत्यू झाले आहेत. एप्रिलच्या १ ते १६ तारखेपर्यंत सव्वादोन हजारांहून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ५ मेपर्यंत हाच आकडा पावणेपाच हजारांपर्यंत गेल्याचे बोलले जात आहे. मृत्यूचा आकडा वाढत असल्याने शहरातील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी नागरिकांना पाच ते सहा तास वेटिंग करावे लागते. मृत्यूनंतरचा प्रवासदेखील खडतर होत असल्याने नागरिकांचा रोष वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने ऑनलाइन पद्धतीने स्मशानभूमीमध्ये जागा शिल्लक आहे की नाही, याची माहिती देण्यासाठी ॲप विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. ॲप्लिकेशनच्या माध्यमातून शहरातील १७ स्मशानभूमींची माहिती मिळणार आहे. स्मशानभूमीत किती बेड आहेत, त्यातील किती बेडची नोंदणी झाली, नोंदणी झालेल्या बेडपैकी किती रिक्त आहेत, याची माहिती तर मिळेलच त्याशिवाय ॲपच्या माध्यमातून स्मशानभूमीमधील बेडची नोंदणीदेखील करण्याची सोय उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर यानिमित्ताने वेटिंग करण्याची वेळ नागरिकांवर येणार नाही, अशी माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. येत्या आठ दिवसांत ॲप विकसित होईल.

शहरात १७ ठिकाणी स्मशानभूमी असली तरी बहुतांशी नागरिकांचा पंचवटी व नाशिक अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्याकडे कल आहे. त्यामुळे स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी नागरिकांना वाट वाट पाहावी लागते हे टाळण्यासाठी अंत्यसंस्काराचे स्वतंत्र ॲप्लिकेशन तयार केले जात आहे.-कैलास जाधव, आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sukhoi Fighter Jet Crash : 'Purvesh Is No More..'! कॅप्टनचे ते शब्द ऐकताच पूर्वेशच्या वडिलांवर मोठा आघात; म्हणाले, 'छत्रपती शिवरायांचा त्याच्यावर..'

US Missile Test: ‘डुम्सडे मिसाईल’ची यशस्वी चाचणी; अमेरिकेकडून पुन्हा शक्तिप्रदर्शन

Ro-Ro Boat: रो-रो फेरी सुरू होताच बंद, प्रवाशांचे आरक्षण पैसे परत; नेमके कारण काय?

Loco Pilot Leaves Train : ट्रेन अर्ध्यातच उभी करुन निघून गेला लोको पायलट; होळीच्या गर्दीत प्रवाशांना ३ तास सहन करावा लागला मनस्ताप

Latest Marathi News Live Update : इराण युद्धाचा पाकिस्तानला तगडा झटका

SCROLL FOR NEXT