Murder esakal
नाशिक

नाशिक : म्हसरूळ परिसरात तरुणाचा खून

सकाळ वृत्तसेवा

म्हसरुळ (नाशिक) : येथील आकाश पेट्राेल पंपाजवळील सावकार गार्डन जवळ बुधवारी (दि. १८) रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास चार-पाच जणांच्या टाेळक्याने २४ वर्षीय तरुणाची चाॅपरने भाेसकून हत्या केली. हत्येचे कारण समजले नसून, घटनेत मृत तरुणाचा मित्र बालंबाल बचावला आहे. ताे टाेळक्याच्या तावडीतून निसटून आल्यावर त्याने घटनेची माहिती दिली. हल्ला करणारे टाेळके घटनास्थळावरून पसार झाले असल्याने त्यांच्या शाेधार्थ पाेलिस पथके रवाना करण्यात आली आहेत.

यश रामचंद्र गांगुर्डे (२४, रा. राजवाडा, म्हसरुळ) असे मृताचे नाव आहे. तर मयूर शिवशरण व सूरज उर्फ बॉबी गांगुर्डे अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्या साथीदारांचा शाेध घेतला जात आहे. मृत यश रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत हाेता. तर फरशी बसवण्याचेही काम करत हाेता, अशी माहिती समाेर आली आहे. त्याने एक वर्षांच्या मुलाचा नुकताच वाढदिवस साजरा केला हाेता. ताे व त्याचा मित्र बुधवारी रात्री पावणे अकरा ते अकरा वाजता सावकरकर गार्डन जवळून जात असताना संशयित अथर्व व त्याच्या तीन ते चार साथीदारांनी अडवून वाद घातला. त्यानंतर चाॅपरने वार करुन यशची हत्या केली. त्याचवेळी यशचा मित्र घटनास्थळावरुन निसटून आला. त्याने घटनेची ओरड करुन कुटुंबाला माहिती दिली. त्या नंतर कुटुंबासह विभाग एकचे सहायक आयुक्त मधुकर गावित, म्हसरुळचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक अशाेक साखरे व गुन्हे शाेध पथक आदी दाखल झाले. मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. त्यावेळी म्हसरुळ राजवाड्यातील शेकडाे नागरिकांनी गर्दी केली हाेती. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून म्हसरुळ पाेलिसांनी मारेकऱ्यांच्या शाेधार्थ पथके रवाना केली आहेत. याबाबत विकास गांगुर्डे यांनी फिर्याद दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT