kamlabai j.png
kamlabai j.png 
नाशिक

अमानुष प्रकार! एकटेपणा..वृध्दपणा अन् त्यात "त्यांनी" वृध्देला गाठलेच..

सकाळ वृत्तसेवा

नाशिक/ मालेगाव : निंबायती (ता. मालेगाव) येथील कमलाबाई जयराम जगताप (वय 65) वृद्धेचा गळा आवळून खून करण्यात आला. मंगळवारी (ता. 25) रात्री हा प्रकार घडल्याचा संशय आहे. बुधवारी दुपारी खुनाचा प्रकार निदर्शनास आला. पोलिस निरीक्षक नरेंद्र भदाणे व सहकारी घटनास्थळी रवाना झाले. खून प्रकरणाच्या चौकशीसाठी नाशिक येथून श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्‍वानाने घरापासून मुख्य रस्त्यापर्यंत माग दाखविला. 

असा घडला प्रकार...

कमलाबाई एकट्या वास्तव्याला होत्या. त्यांची दोन मुले सिन्नरला, तर एक मुलगा कल्याणला असल्याने त्या अधून-मधून मुलांकडे जात होत्या. चार दिवसांपूर्वीच त्या निंबायती येथे आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोन्याचे दागिने खरेदी केल्याची माहिती मिळाली. नंतर मंगळवारी त्यांनी बॅंकेतून काही रक्कम काढल्याचे चौकशीत समोर येत आहे. या पार्श्‍वभूमीवर लुटीच्या इराद्यातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. श्रीमती जगताप बुधवारी सिन्नरला जाणार होत्या. दुपारपर्यंत त्या घराबाहेर न पडल्याने शेजारील रहिवाशांना संशय आला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 
कमलाबाई यांनी रक्कम काढल्याचे माहीत असणारा व परिचयातीलच संशयिताने हा खून केला की काय, या दिशेने पोलिस चौकशी करीत आहेत.

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सायंकाळी जगताप यांचा मृतदेह येथील सामान्य रुग्णालयात चिकित्सेसाठी आणण्यात आला. तालुका पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी चौकशीसाठी दाखल झाले आहेत. रात्री उशिरा श्‍वान पथक दाखल झाले. घरातील खून झालेले ठिकाण ते मुख्य रस्त्यापर्यंत श्‍वानाने माग दाखविला. त्यातून फारशी काही माहिती अथवा धागेदोरे मिळू शकले नाहीत. बुधवारी रात्री उशिरापर्यंत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : भाजपचा रायबरेलीतून उमेदवार ठरला; या नेत्याला मिळाली संधी

SCROLL FOR NEXT