Cultural Programe esakal
नाशिक

सांस्कृतिक क्षेत्र पूर्वपदावर; कार्यक्रमांच्या संख्येतही वृद्धी

तुषार महाले

नाशिक : दोन वर्षात लागलेले निर्बंधानंतर सांस्कृतिक (cultural) कार्यक्रमांसह संगीत क्षेत्र पूर्वपदावर येत आहे. कार्यक्रमांची संख्या वाढत असल्याने कलाकारांना पुन्हा काम मिळणे सोपे झाले असून, कलाकारांचे महिन्यातील बुकिंग वाढल्याने आर्थिक घडी बसविण्यास मदत होत आहे. संगीत क्षेत्राला एप्रिल, मे, जूनमध्ये सर्वाधिक कार्यक्रम असतात. याच काळात शालेय सुटी असल्याने कार्यक्रमांची संख्या वाढणार आहे.

मार्चसह एप्रिल महिन्याचेही कार्यक्रमांचे बुकिंग झाले असल्याने संगीत क्षेत्रातील कलाकारांना दिलासा मिळाला आहे. कोरोना निर्बंध आणि महागाईने कलाकार त्रस्त होते. कोरोना काळात मानधनात कपात करून कलावंत कार्यक्रम करत आहे. आता पुन्हा कलावंतांनी मानधन निश्चितीनुसार कार्यक्रम घेणे आवश्यक आहे. कलावंतांनी मानधनाचे नियोजन करण्याची गरज असल्याचे मत कलावंतांकडून व्यक्त होत आहे. दोन वर्षानंतर रसिकांच्या दाद आणि काम मिळत असल्याने संगीत क्षेत्रातील कलाकारही सुखावले आहेत.

''दोन वर्षाच्या कोरोना निर्बंधानंतर संगीत क्षेत्र पूर्वपदावर येत आहे. मार्चसह एप्रिल महिन्यातही चांगल्या कार्यक्रमांचे बुकिंग झाले आहे. एप्रिल, मे, जूनमध्ये सर्वाधिक कार्यक्रम असतात. निर्बंधामुळे सांस्कृतिक क्षेत्र दहा वर्षे मागे गेले असून, संपूर्ण सुरू होण्यासाठी काही काळ लागेल''.

- उमेश गायकवाड, अध्यक्ष, ऑर्केस्ट्रा असोसिएशन

"रसिक प्रेक्षकांना कार्यक्रम हवे आहेत. कोरोना निर्बंधांमध्ये बरेच कलाकार नोकरीकडे वळले आहे. कलाकारांनी कोरोनाकाळात घेत असलेले मानधन नेहमीप्रमाणे करावे जेणेकरून आर्थिक गणित पुन्हा बिघडणार नाही. कलाकारांना रसिकांची दाद पुन्हा अनुभवास मिळत आहे".

- अमोल पाळेकर, कलावंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Blood Donation Recovery: रक्तदान केल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? शरीर कसं रिकव्हर होतं? ‘या’ 3 गोष्टी ठेवा लक्षात

Illegal Sand Mafia Attack: अंबडमध्ये अवैध वाळू उपशावर कारवाईला गेलेल्या तहसीलदारांसह महसूल पथकाला वाळू माफियांची मारहाण; हायवा ट्रक धडक देत पळवले

SCROLL FOR NEXT