Muslim people protest against MNS Salim Sheikh  esakal
नाशिक

नाशिक : मुस्लिम बांधवांकडून सलीम शेख यांचा निषेध

यूनुस शेख

जुने नाशिक : मनसे नेता सलीम शेख यांनी केलेल्या वक्तव्याचा मुस्लिम बांधवांकडून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यांचा निषेध करणारा फलक जुने नाशिकमध्ये झळकला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील निषेध व्यक्त केला जात आहे.


मशिदवरील भोंगे उतरविले नाही तर मशीदी समोर हनुमान चालीसा मोठ्या आवाजात लावण्याचे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS chief Raj Thackrey) यांनी केले होते. शहरातील माजी नगरसेवक तसेच मनसे (MNS) नेता सलीम शेख यांनी त्यांच्या वक्तव्यास समर्थन देत मुस्लिम बांधवांची नाराजगी ओढवून घेतली आहे. जिल्ह्यासह पर जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरासह पुणे तसेच अन्य शहरातील मुस्लिम मनसे पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सलीम शेख यांनी देखील पदाचा राजीनामा देणे अपेक्षित असताना राज ठाकरे यांचे समर्थन केले आहे.

त्यामुळे मुस्लिम बांधवांचे मन दुखावले आहे. शिवाय राज ठाकरे आणि सलीम शेख यांच्याकडून अशा प्रकारचे वक्तव्य करत दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहे. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत मुस्लिम बांधवांकडून बडी दर्गा परिसरात सलीम शेख यांचा निषेध करणारा फलक लावण्यात आला होता. भद्रकाली पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत फलक हटविण्यास सांगण्यात आले. त्यानंतर निषेधार्थ फलक तेथून काढून घेण्यात आला. सोशल मीडियावर (Social Media) मात्र अद्यापही त्यांचा निषेध करणारा संदेश झळकत आहे. अजूनही मुस्लिम बांधवांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न सलीम शेख यांनी करू नये. अशा प्रतिक्रिया अनेकांकडून देण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Politics: डीके शिवकुमार CM बनण्याआधीच कर्नाटकमध्ये प्रेशर पॉलिटिक्स! दलित-लिंगायत समाजाकडून मोठी मागणी, काँग्रेससमोर नवी डोकेदुखी

Mahur Renuka Devi Temple: माहूर गडावरील श्री रेणुका देवीला आंब्याची आरास; अधिक महिन्यात भाविकांची मोठी गर्दी

Baramati Sugarcane Farming: पणदरेत ‘ऊस शेतीची नवी दिशा’ परिसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद; एकरी १०० टन ऊस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शक दिशा

Chakan Onion Price Row: कांदा दरप्रश्नी चाकण बैठक की राजकीय आखाडा? शेतकरी संघटनेच्या नेत्यांत वाद

Pune Toxic Liquor: पुणे-पिंपरीतील विषारी दारूकांडाचा उगम उरुळीकांचन? स्थानिक तरुणाचा मृत्यू, भेसळ रॅकेटवर संशय तीव्र

SCROLL FOR NEXT