MVP Election gathering Yeola esakal
नाशिक

MVP Election : येवल्यासाठी प्रगती पॅनेलकडून माणिकराव शिंदेंचे नाव जाहीर

संपत देवगिरे

मविप्र संस्थेच्या २०२२-२७ निवडणुकीसाठी येवला तालुक्यातून माणिकराव शिंदे यांचे नाव माजी आमदार मारोतराव पवार यांनी जाहीर केले. अंजनी सूर्य लोन्स येथे झालेल्या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

यावेळी जेष्ठ नेते रामचंद्रबापू पाटील,निलीमाताई पवार,माणिकराव बोरस्ते,डॉ तुषार शेवाळे,डॉ सुनील ढिकले, डॉ विलास बच्छाव,केदानाना बच्छाव,नाना महाले,भाऊसाहेब खताळे,डॉ जयंत पवार,उत्तमबाबा भालेराव,सचिन पिंगळे,नारायण हिरे,विकी सोनवणे,डॉ आत्माराम कुंभार्डे,डॉ प्रशांत पाटील,विलास मत्सागर,दत्ताकाका गडाख, बापूसाहेब आहेर,आण्णासाहेब गायकवाड,सूर्यभान नाईकवाडे,माणिकराव शिंदे,हेमंत वाजे इ.उपस्थित होते. (MVP Election Manikrao Shinde name announced by Pragati panel in yeola nashik Latest Marathi News)

माजी आमदार मारोतराव पवार यांनी ‘ निलीमाताई पवार यांनी अहोरात्र कष्ट करून संस्थाहित जोपासून सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे धोरण अंगिकारले असून राज्यभर संस्थेच्या कामाचा नावलौकिक आहे.समाजासाठी मतभेद विसरून एकदिलाने काम करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

निलीमाताई पवार यांनी ‘ येवलेकरांनी एकमताने उमेदवार देऊन आदर्श निर्णय घेतला. शिक्षण व्यवस्थेत निवडणुकाच व्हायला नकोत.संस्था पिढ्या घडविण्याचे केंद्र असून कोविडकाळात संस्थेच्या मार्फत आरोग्यसेवा दिली तसेच ऑक्सिजन अभावी एकही रुग्ण दगावला नाही. २५ ते ५० एकर जमीन उपलब्ध करून देणाऱ्या तालुक्यात संस्था बी ए एम एस कॉलेज सुरु करण्याचा प्रयत्न करील असे यावेळी सांगितले.

रामचंद्रबापू पाटील यांनी ‘ त्याग व परिश्रमातून कर्मवीरांनी संस्था उभारली.समाजावर निष्ठा असणारे लोक येवल्यात असून सत्तेवर असतांना उमेदवारी न मागणारे रायभान अण्णा समाजासाठी आदर्श आहेत.

मेडिकल कॉलेज हे संस्थेचे भूषण असून निलीमाताई पवारांनी आमदार-खासदारकीची संधी असतांना संस्थेच्या कामाला प्राधान्य दिले असे सांगतांना बेसावध न राहता एकमताने प्रगती पॅनेलला विजयी करण्याचा निर्धार करा असे आवाहन केले.

माणिकराव बोरस्ते यांनी ‘ एकमताने उमेदवार दिल्याबद्दल येवलेकरांचे अभिनंदन करतांना संस्थेची विकासाच्या दृष्टीने वाटचाल सुरु असून विरोधकांनी बेछूट आरोप न करता विकासावर बोलावे असे सांगितले.

माणिकराव शिंदे यांनी ‘ एकमताने उमेदवारी दिल्याबद्दल आभार व्यक्त करतांना ऐतिहासिक मताधिक्य्याने प्रगती पॅनेल विजयी होईल असा विश्वास व्यक्त करतांना बनकर कुटुंबियांना १५ वर्ष कामाची संधी देऊन देखील विरोधाकांसोबत हातमिळवणी केली हे दुर्दैवी असल्याचे सांगितले.

रायभान काळे यांनी ‘ पुरुषांना लाजवेल असे कार्य निलीमाताई यांनी उभारले असून आपल्या कार्यकाळात संस्थेचे बजेट हे ३५० कोटी रु.वरून ८५० कोटींवर पोहचवले.तसेच येवला येथे होरायझन अकॅडमी सुरु करून येवलेकरांना इंगजी शिक्षणाचे द्वार उघडले असे सांगितले. यावेळी जेष्ठ सभासद गुंजाळ गुरुजी,रामदास गायकवाड,अशोक बोराडे यांनी मनोगत व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मोनोरेल बंद, मेट्रोतही तांत्रिक बिघाड; घाटकोपर रेल्वे स्थानकावर उसळली प्रवाशांची गर्दी

'त्या घटनेनंतर मी खूप रडलो होतो' अभिनेता राजकुमार राव स्पष्टच बोलला, म्हणाला, 'आम्हाला काय भावना नाहीत का?'

Cyber Security : जगभरात चक्क १६ अब्ज पासवर्ड झाले लीक; भारत सरकारने दिला इशारा, तुमचं अकाऊंट सुरक्षित करा एका क्लिकवर..

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

India Vs England : दुसऱ्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय, 'या' वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश

SCROLL FOR NEXT