MNS officials naming the potholed road as Ex Corporator Puncture Centre.
MNS officials naming the potholed road as Ex Corporator Puncture Centre. esakal
नाशिक

खड्डेयुक्त रस्त्यांचे ‘माजी नगरसेवक पंक्चर सेंटर’ नामकरण

सकाळ वृत्तसेवा

सिडको : सिडकोच्या नवीन प्रभाग क्रमांक ३० मधील खोडे मळा चौफुली भागातील रस्त्यांच्या दुरवस्थेला माजी नगरसेवकांना (Ex Corporator) कारणीभूत धरत मनसेतर्फे (MNS) या चौफुलीचे ‘माजी नगरसेवक पंक्चर सेंटर’ असे नामकरण करून निषेध नोंदवण्यात आला.

उपरोक्त फलक लावत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (Naming the potholed roads as Ex Corporator Puncture Centre by MNS nashik Latest Marathi News)

परिसरातील सहा महिन्याअगोदरच काम केलेल्या रस्त्यावर मोसमातल्या पहिला पावसानेच तीनतेरा वाजले. सर्वत्र खड्डे झालेल्या या रस्त्यावरून वाहनधारक तसेच पायी प्रवास करणाऱ्या नागरीकांना आपला जीव मुठीत प्रवास करावा लागत आहे.

या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे लहान- मोठे अपघात तर होतच आहे, पण वाहनांची चाके पंक्चर होण्याचे प्रमाणही वाढले आहे. या निकृष्ट कामात ठेकेदार, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे काही आर्थिक संबंध तर नाहीत ना अशी उघड चर्चा सुरू झाली आहे.

मनसेतर्फे या रस्त्याच्या दुरवस्थेकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी या रस्त्याचे ‘माजी नगरसेवक पंक्चर सेंटर’ असे अभिनव नामकरण करण्यात आले. परिसरातील व्यावसायिक व नागरिकांनीदेखील याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

या वेळी मनसे चित्रपट सेनेचे शहराध्यक्ष अक्षय राजेंद्र खांडरे, शहर चिटणीस संदीप दोंदे, शहर संघटक अर्जुन वेताळ, प्रसाद जाधव, कैलास मोरे, संदीप बोरसे, देवचंद केदारे, मच्छिंद्र पांगरे, बाळा पाटील, राजेंद्र देवरे, रोहन बिरार, प्रणव दाभाडे, अभिनव नवलाख, प्रथमेश तेजाळे, यश निकम, आविष्कार खैरनार आदींसह सिडकोतील मनसे सैनिक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

Mouni Roy: एका दिवसात तीस गोळ्या अन् इंजेक्शन्स; तीन महिने अंथरुणाला खिळून होती मौनी रॉय, अशी झाली होती अवस्था

PBKS vs CSK : चेन्नई संघासमोर गोलंदाजीचे प्रश्नचिन्ह; मागील सामन्यात पराभव झालेल्या पंजाबविरुद्ध पुन्हा सामना

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT