Record arrival of onion in market committee on Friday. esakal
नाशिक

Nashik Onion Rate: नामपूर बाजार समितीत उन्हाळ कांद्याला 5 हजार 505 रुपयांचा सर्वोच्च भाव

सकाळ वृत्तसेवा

Nashik Onion Rate : येथील बाजार समिती व करंजाड उपबाजार आवारात शुक्रवारी (ता. २७) एक हजार ६०० वाहनांमधून सुमारे २९ हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची विक्रमी आवक झाली.

कांद्याने पहिल्यांदा पाच हजार ५०० चा टप्पा गाठला असून, गेल्या आठवड्यापेक्षा कांद्याच्या भावात सरासरी एक हजार रुपयांची वाढ झाली. (Nampur Bazar Samiti Summer Onion highest price of 5505 nashik news)

उन्हाळ कांद्याला पाच हजार ५०० ते पाच हजार ५०५ रुपये प्रतिक्विंटल असा सर्वोच्च, चार हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल असा सरासरी भाव मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब अहिरे व उपसभापती भाऊसाहेब कांदळकर यांनी दिली.

यंदा आठवड्याच्या सुरवातीपासून कांद्याचे भाव वधारल्याने येथील बाजार समितीत उन्हाळ कांद्याची विक्रमी आवक झाली. या तेजीमुळे शेतकरी समाधानी आहेत. यंदा पावसाअभावी लाल कांद्याची आवक सुमारे एक महिना उशिराने होणार असल्याने आगामी काळात नवीन कांदा बाजारात येईपर्यंत कांद्याचे दर टिकून राहतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

नामपूरला एक हजार ३२ वाहने, तर करंजाडला ५६७ वाहनांचे लिलाव करण्यात आले. शेतकऱ्यांनी मालाची प्रतवारी करून माल विक्रीस आणावा, लिलाव झाल्यावर संबंधित व्यापाऱ्यांकडून रोख पेमेंट घ्यावे, शेतकऱ्यांनी वाहन पार्किंग करताना बाजार समिती प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सचिव संतोष गायकवाड, अरुण अहिरे यांनी केले आहे. दरम्यान, लाल कांदा बाजारात आल्याने कांद्याच्या भावाला झळाळी मिळाली आहे. दिवाळीपर्यंत कांद्याचे भाव चढेच राहतील. शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने माल बाजारात आणावा.

लाल कांदा बाजारात न आल्यास उन्हाळ कांदा अजून उसळी घेईल. शेतकऱ्यांना फायदा मिळत असेल तर केंद्र सरकारने आडकाठी आणू नये, असे कांदा निर्यातदार शरद देवरे यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT