accident on road.jpg 
नाशिक

रक्ताच्या थारोळ्यात 'तो' वेदनेने विव्हळत होता...पण माणुसकी हरली..वाचा काय घडले

दिपक खैरनार : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : (अंबासन) शनिवारी (ता. २५) रात्रीच्या सुमारास वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी होऊन एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कमलेश मगरे असं अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या दुर्देवी घटनेमुळे परिसरात दु:ख व्यक्त केले जात आहे.

अशी आहे घटना

शनिवारी (ता. २५) रात्री साडेआठच्या सुमारास कमलेश प्रकाश मगरे (वय ३५, रा. चिलाणे, ता. शिंदखेडा, धुळे) हे दुचाकी (एमएच १८, एई ४३०६)ने नामपूरहून साक्रीकडे जात असताना वरचे टेंभे (ता. बागलाण) गावाजवळील वळण रस्त्याच्या पुढे साक्रीहून भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक देऊन पोबारा केला. यात कमलेश यास गंभीर दुखापत झाली. स्थानिक पोलिसपाटील वर्षा वाघ यांनी अपघाताची माहिती जायखेडा पोलिस ठाण्यात दिली असता, हवालदार जे. एल. महाजन, पोलिस कॉन्स्टेबल राजेंद्र वाघ, उमेश भदाणे यांनी घटनास्थळी दाखल होत तातडीने गंभीर जखमी कमलेशला नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. 

अज्ञात वाहनाचा शोध सुरु

अपघातात कमलेश यांना जबर मार लागल्याने रक्तस्त्राव अधिक झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. जायखेडा पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून तातडीने रस्त्यावरील ठिकठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून अज्ञात वाहनाचा शोध घेतला जात आहे. 

(संपादन - किशोरी वाघ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT