Nandgaon is missing from records of trigger 1 and trigger 2 procedures adopted for drought nashik news esakal
नाशिक

Nashik News : सॅटेलाइटच्या दुष्काळासाठीच्या नोंदीतून नांदगाव गायब; मदत व पुर्नवसन विभागाचे दुर्लक्ष

संजीव निकम : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सॅटेलाइटच्या डोळ्यांना सर्वेक्षणात दुष्काळ दिसला. मात्र,प्रत्यक्षात दुष्काळाच्या झळा जाणवल्या नाहीत, असाच काहीसा प्रकार सध्या तालुक्याच्या वाट्याला आला आहे. याउलट सगळं कस आलबेल असल्याची इमेज सॅटेलाईट ने टिपली असावी असे वातावरण यंत्रणेकडून उभे करण्यात आले आहे.

त्यात भर घातली ती शासनाच्या मदत व पुर्नवसन विभागाने. दुष्काळासाठी स्वीकारण्यात आलेल्या ट्रिगर १ व ट्रिगर २ या कार्यपद्धतीच्या नोंदीतून नांदगाव गायब झाले विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील सर्वात कमी झालेला पाऊस, उत्पादनात झालेली नीचांकी घट या बाबीकडे अधिक विश्वासार्हता म्हणून वापरण्यात आलेल्या सॅटेलाईटच्या आधुनिक असणाऱ्या डोळ्यांनाही भीषणता जाणवली नाही. (Nandgaon is missing from records of trigger 1 and trigger 2 procedures adopted for drought nashik news)

अन ग्राउंड लेव्हलवरच्या आपल्याच कार्यपद्धतीला बगल देत शासनाच्या मदत व पुर्नवसन विभागाने केवळ नांदगावचं नव्हे तर चांदवड व देवळा अशा तालुक्यातल्या स्थितीलाही अनुल्लेखाने चक्क दुर्लक्षित केले. त्यामुळे असंतोषाचा हा वणवा आता पेटलाय आधुनिक तंत्रज्ञानावर विसंबून असणारी तालुका व जिल्हास्तरीय यंत्रणा गाफील राहिली.

शासनाच्या मदत व पुर्नवसन विभागाच्या वतीने जाहीर झालेल्या या कार्यपद्धतीमुळे दुष्काळाने होरपळणाऱ्या तालुक्यासह मतदार संघावर अशी अवस्था ओढविलेली बघून आमदार सुहास कांदे यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली, संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळत नाही हा असा अनुभव केवळ आमदार सुहास कांदे यांचा एकट्याचा नाही तो तालुक्याच्या जनतेचाही आहे.

गेल्या अनेक वर्षात रेल्वे गाड्यांचा थांबा मिळणे असो कि मोबाईलची साधी रेंज मिळण्याची बाब असो किंवा पिण्याच्या पाण्यासाठीची आंदोलने असो कि साधा सातबाराचा उतारा मिळवायचा असो नांदगावकर अन आंदोलने असे जणू समीकरणे गेल्या अनेक वर्षातली सांगता येण्याजोगी आहे. मात्र आमदार सुहास कांदे यांनी आता दुष्काळाच्या मुद्दयांवर आपली प्रतिष्ठा पणाला लावली असून आपल्याच सरकारला त्यांनी पुन्हा एकदा ललकारले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटचे विश्वासू सहकारी म्हणून आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्यामुळे नव्या सुधारीत यादीत नांदगावचा समावेश होण्याचा मार्गही मोकळा होऊ शकतो. भीषणता वाट्याला आलेल्या नांदगाव तालुक्याचा उपयोजनेच्या पहिल्या टप्प्यात कोंडी कुणामुळे झाली तेही यथावकाश पुढे देखील येईल.

मात्र या सगळ्या घटनाक्रमात ज्या तालुका व जिल्हा स्तरीय यंत्रणेची भूमिका महत्वाची असते त्यातील झारीतले नेमके शुक्राचार्य कोण याचाही उलगडा झाला पाहिजे. यंत्रणा गाफील राहिली कि काय घडू शकते याचा अनुभव यानिमीत्ताने नांदगावकरांना आला एवढे मात्र खरे .

नोंद झालेले पर्जन्यमान(६४.३%), पैसेवारी(३६), खरीप पिकांची सरासरी उत्पादकता (४.२१), शासनाचे उपग्रह पर्जन्यमान ठरवतात. नमूद केलेल्या आकडेवारीचे मेरीट ‘त्या‘ तीन तालुक्यांपेक्षा दुष्काळावर पहिला हक्क सांगणारे आहेत. जिल्हा स्तरावर सुद्धा शासनाकडून प्रस्तुत माहिती मागवलेली नाही अशी माहिती आहे

"आपल्यासाठी विकासाची बांधिलकी,सर्वोच्च अग्रक्रमाने असून लवकरच नव्या सुधारित यादीत नांदगाव तालुक्याचा समावेश झालेला दिसणार आहे त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,कृषिमंत्री धनंजय मुंढे यांच्या निदर्शनास हा प्रकार लक्षात आणून दिला आहे" -आमदार सुहास कांदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चेडगावमध्ये बिबट्याचा धुमाकूळ ! 'पंधरा दिवसांत चार जणांवर हल्ला'; रात्री साडेनऊ वाजता भर रस्त्यावर ठाण मांडून अन्..

Gautam Gambhir : रोहित-विराटबाबत गौमत गंभीरचं मोठं विधान...भारतीय संघाच्या विजयानंतर व्यक्त केली 'ही' इच्छा...

Latest Marathi News Live Update : अंगावर भिंत पडल्याने कामगारांचा मृत्यू, भोसरी एमआयडीसीतील घटना...

Chandrapur Crime: प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा खून; हरदोना हादरले, मारेकरी प्रियकर-पत्नीला १२ तासात अटक

Gold Rate Today : सोन्याच्या भावात एका आठवड्यात मोठी उसळी, चांदीतही ५००० हजारांची वाढ; आज तुमच्या शहरात काय आहे भाव? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT