nandgaon2.jpg 
नाशिक

नांदगावचे रेल्वे फाटक कायमस्वरूपी होणार बंद?...नागरिकांचा विरोध

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (नांदगाव) येथील रेल्वेच्या फाटकाला पर्याय म्हणून भुयारी मार्गाच्या कामाला वेग आला आहे. रेल्वे फाटकावर चिकटवलेली नोटीसमध्ये देखील नोंद असून रेल्वे फाटक गुरुवारपासून बंद असणार आहे. बोगद्याचे काम अपूर्ण असतानाच रेल्वे फाटक गुरुवार (ता. 18) पासून कायमस्वरूपी बंद होणार हे कळताच नांदगावकरांकडून विरोध केला जात आहे.

नांदगावकरांकडून होतोय विरोध

रेल्वे फाटक गुरुवार (ता. 18) पासून कायमस्वरूपी बंद होणार आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तशी सूचना काढली आहे. ही सूचना फाटकावर लावली आहे. या फाटकाला पर्याय म्हणून सुरू असलेल्या "सब-वे'च्या कामाअगोदर कायमस्वरूपी फाटक बंद करण्याच्या रेल्वे अधिकाऱ्यांच्या भूमिकेला नागरिकांनी आता विरोध केला आहे. दरम्यान, पालिकने लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या मटण मार्केटला खेटून भुयारी मार्गावर डाउन साइडचे प्रवेशद्वार होणार, की रेल्वे भुयारी मार्ग पूर्ण करून तसाच टाकून देणार याबाबत संभ्रम कायम आहे. 

तीन मीटर उंचीचा "सब वे' असणार

भुयारी मार्गाचा रस्ता कुठून कसा काढायचा, यावर अजूनही स्पष्टता नसताना रेल्वे अधिकाऱ्यांनी पर्याय देण्यापूर्वीच फाटक बंद करण्याचा निर्णय घोषित केला आहे. भुसावळ विभागातील फाटक बंद करण्याच्या दृष्टीने रेल्वेतर्फे सध्याच्या फटकाजवळील खांब क्रमांक 184/85 मधील जागेवर सध्या भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. लोहमार्गाखालून सहा मीटर खोल व तीन मीटर उंचीचा "सब वे' असणार आहे. यापूर्वी या कामासाठी मुंबई येथील जय इन्फ्रा प्रा. कंपनीला दोन महिन्यांची मुदत दिली होती. त्यांनी कामालाही सुरवात केली होती. मात्र, कोरोनामुळे हे काम रेंगाळले होते. लेंडी नदीपात्राशेजारी जुन्या फाटकाजवळ दोन महिन्यांत काम पूर्ण होऊन त्याखालील वाहतूक येवला रस्त्याला संलग्न करण्याचे नियोजनही ठरले होते. तरीही काम रेंगाळले होते. अप साइडने बोगद्याचे काम जवळपास पूर्णत्वाकडे आले आहे. 

वाहनांची कोंडी होणार

भुसावळकडील डाउन बाजूच्या लोहमार्गाखालील बोगद्याच्या कटिंग कामाला सुरवात झाली. हे काम प्रगतिपथावर असताना, गुरुवारपासून फाटक कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश रेल्वे अधिकाऱ्यांनी काढले आहेत. सध्या या फाटकातून औरंगाबाद व येवल्याकडे राज्य महामार्ग जात असल्याने वाहतूक होते. फाटक बंद केल्याने तीन किलोमीटर अंतरावरील उड्डाण पुलाकडून वाहतूक वळवून शहरात प्रवेश घ्यावा लागणार आहे. विशेषतः बाजारहाटाला येणाऱ्या व नव्या प्रशासकीय इमारतीकडे जाणाऱ्या वाहनांची कोंडी होणार आहे. 

अजूनही काम अपूर्ण असून, फाटक कायमस्वरूपी बंद करण्याला विरोध करू. यामुळे शहराचे अगोदरच विभाजन झाले. आता ये-जा करण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. - संतोष गुप्ता, नांदगाव  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT