Panvellis spread in Nandur Madhmeshwar dam area.
Panvellis spread in Nandur Madhmeshwar dam area. esakal
नाशिक

Nashik: नांदूरमधमेश्‍वर धरणाचा कोंडला श्‍वास!

सकाळ वृत्तसेवा

Nashik : नाशिक, नगर आणि मराठवाड्याची जीवन वाहिनी म्हणून नांदूर मधमेश्‍वर धरणाची ओळख आहे. परंतु, प्रचंड गाळ व पानवेलींमुळे श्‍वास कोंडलेल्या या धरणाकडे पाण्यासाठी भांडणाऱ्यांचे मात्र अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे. (Nandurmadhmeshwar dam breath Sludge of those fighting for water but unforgivable neglect of Panvelis Nashik news)

खानगाव थडी (ता. निफाड) या गावाजवळ गोदावरी व कादवा नदीच्या संगमावर ब्रिटिशकालीन नांदूर मधमेश्‍वर धरण आहे. शंभरी गाठलेल्या या धरणात दरवर्षी गोदावरी आणि कादवा नदीच्या उपनद्यांना येणाऱ्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात गाळाचे व पानवेलींचेही साम्राज्य पसरलेले आहे.

नाशिक, नगर आणि मराठवाड्यातील प्रमुख शहरांसाठी गोदावरी कालव्यांच्या माध्यमातून या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. नाशिक जिल्ह्यातील गोदाकाठ भागातदेखील अनेक पाणी योजना या धरणावर अवलंबून आहेत.

नेहमीच पाण्यासाठी भांडणारे लोकप्रतिनिधी आणि पुढाऱ्यांना धरणाकडे पाहायला मात्र वेळ नाही. २००८मध्ये धरणाचे मजबुतीकरण करण्यात आले. त्यानंतर पाच गेटदेखील बसविण्यात आले. मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नाही.

धरणात साठलेला गाळ आता गोदाकाठ परिसरासाठी कर्दनकाळ ठरत आहे. थोड्याशा पावसातदेखील या भागात पूर परिस्थिती निर्माण होत असल्याने त्याचा फटका नागरिकांना बसतो. तर दुसरीकडे गोदाकाठ भागात जमिनी खचत असल्याचेही शेतकरी सांगतात.

त्यामुळे जीवन वाहिनी म्हणून ओळखले जाणारे हेच धरण भविष्यात गोदाकाठसाठी ‘मरण’ तर ठरणार नाही ना, अशी गंभीर परिस्थिती येथे ओढवली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नाशिक महापालिका क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्रातील सांडपाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदुषित पाणी, मोठ्या प्रमाणात पसरलेल्या पानवेली आणि शंभर वर्षात साठलेला गाळ यामुळे धरणाचा श्‍वास कोंडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. याकडे तातडीने आणि गांभिर्याने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.

"नांदूर मधमेश्‍वर धरणातून शेकडो गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी शासकीय योजना कार्यान्वित आहे. परंतु, धरण बांधल्यापासून आजतागायत धरणातील गाळ काढलेला नाही. त्यामुळे ८० टक्के धरण गाळानेच भरलेले आहे. उर्वरित २० टक्के पाणी असले, तरी नाशिक महापालिकेच्या आडमुठेपणामुळे नाशिकच्या सर्व पानवेली या धरणात जमा झालेल्या आहेत. त्यामुळे मोठे प्रदूषण होत असल्याने पानवेली तातडीने काढण्याची मागणी पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे." -प्रकाश पाटील, शिवसेना तालुका प्रमुख.

"नांदूर मधमेश्‍वर धरणात साठलेला गाळ आणि पानवेलींमुळे गोदाकाठवासियांना फटका बसत आहे. या भागातील जमिनीदेखील खचू लागल्याची परिस्थिती आहे. अशातच पानवेलींमुळे होणाऱ्या जल प्रदूषणामुळे आरोग्याचाही प्रश्‍न निर्माण होत आहे. याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे." -विनायक खरात, सरपंच, चांदोरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT