narhari zirwal
narhari zirwal esakal
नाशिक

लस दोनदा घेतली... मी जिवंत आहे बघा!

महेंद्र महाजन

नाशिक : ‘मी दोनदा लस घेतली अन्‌ जिवंत आहे बघा!’ असे सांगत विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आदिवासींचा आत्मविश्‍वास दुणावयास सुरवात केलीय. आजाराने जर्जर झाले अन्‌ उठणं-बसणं कठीण झाल्यावर अथवा कुणी तरी दवाखान्यात नेल्यावर उपचारासाठी राजी होणाऱ्या आदिवासींच्या पट्ट्यात कोरोनाने धुमाकूळ घातलायं. अशा परिस्थितीत आदिवासींना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पाठपुरावा सुरू केलायं. त्यातच पुन्हा कोरोना प्रतिबंधाची लस घेतली की माणूस मरतो, अशी चुकीची समजूत झाल्याने झिरवाळ यांनी स्पष्ट केले.

कामावरून आजार घेऊन गेले

आदिवासी भागातून रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्यांपैकी अनेक जण कडक निर्बंधात कामावरून घरी आजार घेऊन गेले. त्यामुळे अख्खं गाव तापाने फणफणले. अशावेळी उपचाराची स्थिती काय आहे, जाणून घेतल्यावर झिरवाळ यांना धक्कादायक माहिती समजली. सुरगाणा तालुक्यात ६७ बोगस डॉक्टर असल्याची कुणकुण त्यांना लागली होती. अशा डॉक्टरांकडून चाचणी न करता पहिल्यांदा पाच दिवसांची आणि नंतर दोन ते तीन दिवसांची औषधे दिली जायची. प्रतिकारशक्ती कमजोर असलेले आदिवासींना ऑक्सिजन लावण्याची वेळ येत राहिली. झिरवाळ यांनी आता आदिवासी उपचारासाठी आले आणि त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळताच, त्यांचे नाव, फोन नंबर, गाव याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवायची आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी लगेच संबंधित आदिवासींची कोरोना चाचणी करायचे, असा आदेश यंत्रणेला दिला आहे. आता हळूहळू आदिवासी उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत येऊ लागल्याची स्थिती झिरवाळ यांना पाहायला मिळू लागली आहे.

आदिवासी भागात हळूहळू लसीकरणाला प्रतिसाद

आजारी पडल्यावर सरकारी दवाखान्यात जाऊन तपासणी करून घेण्यास आदिवासी धजावत नाहीत. हे असे का होते, याचा शोध झिरवाळ यांनी घेतल्यावर दवाखान्यात गेल्यावर ‘पॉझिटिव्ह’ काढतात, मग लस देतात, मग माणूस मरून जातो, असा पसरलेला गैरसमज त्यांच्या ध्यानात आला. त्यावर, लस घेण्यासाठी आदिवासींनी तयारी करावी म्हणून झिरवाळ यांनी गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि त्यांच्या कुटुंबीयांना पहिल्यांदा लस टोचून घेण्याची सूचना केली. त्यामुळे आता आदिवासी भागामध्ये हळूहळू लसीकरणाला प्रतिसाद मिळू लागला आहे.

नाशिकवरचा ताण हलका करण्याचा प्रयत्न

बाऱ्हे, हरसूल, सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर, दिंडोरी या भागातून आदिवासींना उपचारासाठी नाशिकमध्ये यावे लागते. मात्र नाशिकमधील सरकारी रुग्णालयात खाटा शिल्लक नसल्याने आदिवासींना उपचार मिळणे मुश्‍कील बनले आहे. त्यामुळे नाशिकवरील ताण हलका करण्यासाठी झिरवाळ यांनी लोकसहभागातून ऑक्सिजनची सुविधा आदिवासी भागात उभारण्यावर भर दिला आहे. सुरगाणा तालुक्यातील रुग्ण पेठला न्यावे लागत असल्याने सुरगाण्यात डेडिकेटेड कोरोना हेल्थ सेंटर सुरू केले जाणार आहे. वणीमध्ये ४५ खाटा असून, आणखी ३० खाटा ऑक्सिजनच्या केल्या जात आहेत. पेठमध्ये पूर्वीच्या २२ खाटा असून, आणखी २५ खाटा ऑक्सिजनच्या केल्या जात आहे. दिंडोरीमध्ये आयटीआय भागात ३५ ऑक्सिजनच्या खाटांची व्यवस्था करण्यात येत आहे. हरसूलमध्ये डेडिकेटेड कोरोना हेल्थ सेंटर सुरू करण्यासाठी उद्या (ता. २९) आमदार हिरामण खोसकर यांच्या उपस्थितीत बैठक घेतली आहे, अशी माहिती झिरवाळ यांनी दिली.

लोकसहभागाचे सिलिंडर कोण भरून देणार?

लोकसहभागातून आदिवासी भागात ऑक्सिजनच्या खाटा उपलब्ध करण्यात येत आहे. त्यासाठी ऑक्सिजनचे सिलिंडर मिळविण्यात आले आहेत. पण अगोदरच अधिकृत मान्यताप्राप्त रुग्णालयांचे सिलिंडर भरण्यासाठी रांगा लागत असताना लोकसहभागातून मिळालेल्या सिलिंडरमध्ये ऑक्सिजन कोण भरून देणार, असा गंभीर प्रश्‍न झिरवाळ यांच्यापुढे उभा ठाकला आहे. या प्रश्‍नाची तड लावण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यासमवेत बैठक घेण्यात येणार असल्याचे श्री. झिरवाळ यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "केजरीवालांना स्वतंत्र कोठडी अन् साधा कूलरही नाही"; आतिषी यांचा राज्यपालांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

SCROLL FOR NEXT