naroshankarachi  ghanta
naroshankarachi ghanta esakal
नाशिक

नारोशंकराची घंटा

सकाळ वृत्तसेवा

ऑनलाइन बदल्यांमुळे शिक्षकांची बचत

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्या या तशा नानाविध कारणांनी नेहमीच चर्चेत राहात असतात. यंदा मात्र त्या वेगळ्या कारणांनी चर्चेत असून, शिक्षकांनी शासनाला धन्यवाद दिले आहेत.

झाले असे, की यंदा या बदल्या ऑनलाइन बदलीप्रक्रियेने झाल्या. त्यामुळे एरवी या बदल्यांमध्ये होणारी लोकप्रतिनिधी, शिक्षण विभागाचे अधिकारी यांची लुडबूड शिल्लकच राहिली नाही. यापूर्वी या बदल्यांमध्ये दर वर्षी मोठी आर्थिक उलाढाल पडद्यामागे होत असे, अशी वदंता शिक्षकातच असते.

यंदा असा कुठलाही प्रकार राहिलाच नाही. त्यामुळे आपल्या योग्यतेनुसार शिक्षकांना बदली मिळाली. जिल्हा परिषदेच्या आवारात या बदल्यांबाबत काही शिक्षकांमध्ये चर्चा सुरू होती. आपण तर बुबा शासनाला धन्यवादच देतो या ऑनलाइन बदलीप्रक्रियेबाबत.

दर वर्षी नसती उठाठेव करावी लागायची. शिवाय बायकोसाठी वेगळी आणि स्वतःसाठी वेगळी फिल्डिंग लावावी लागायची. यंदा तो ताणही गेला आणि पैसेही वाचले, असे एकाने सांगताच तुमचेच नव्हे यंदा राज्यात संवर्ग १ ते ४ प्रवर्गात साडेअडतीस हजार बदल्यांमुळे शिक्षकांच्या कोट्यवधी रुपयांची बचत झाली आहे. यावर एकच हास्यकल्लोळ उडाला. (naroshankarachi ghanta sakal special comedy tragedy nashik news)

चक्क शोरूम गाड्यांची स्पर्धा!

एखाद्या गोष्टीची सवय जडली, की त्याच गोष्टी कालांतराने अंगवळणी पडतात. जसे की, शहरातील एका मैदानावर नियमितपणे कुठल्या ना कुठल्या क्रीडा स्पर्धा होत असतात. त्यामुळे येथील वॉचमन असतील किंवा प्रशिक्षकांना या स्पर्धांचे फारसे अप्रूप असते.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअमवर दररोज कुठल्यातरी स्पर्धा असल्यामुळे येथील कर्मचाऱ्यांनाही या गोष्टी जणू सवयच झाली होती. एक दिवस अचानक एकामागोमाग नऊ रुग्णवाहिका एका रांगेत येऊन उभ्या राहतात.

त्यांच्यासमोरच्या रांगेत ‘छोटा हत्ती’ येऊन उभा राहतो. थोड्या वेळाने जवळपास शे-दीडशे रंगीबेरंगी सायकली एका रांगेत लावल्या जातात. सफेद रुग्णवाहिका, त्यांच्या समोर ‘छोटा हत्ती’ची रांग आणि बाजूला रंगीबेरंगी सायकली, एखाद्या शोरूमसारख्या गाड्या उभ्या राहिलेल्या असतात.

हे बघून एक खेळाडू तेथे येतो आणि वॉचमनला विचारतो, की या गाड्या का आल्या आहेत. वॉचमन दररोजचे सामने बघून अगोदरच कंटाळलेला असतो; पण तो अगदीच निरुत्साहाने म्हणतो, आज येथे गाड्यांची शर्यत रंगणार आहे. हे ऐकून हा बिचारा खेळाडू एक, दोन नव्हे तर तब्बल तीन तास स्पर्धा सुरू होण्याची वाट बघत बसतो.

अचानकपणे मंत्री तेथे येतात आणि फीत कापून या गाड्यांचे लोकार्पण करून निघून जातात. त्यांच्या पाठोपाठ या गाड्याही धूळ उडवत भुर्रकन निघून जातात. तेव्हा या बहाद्दराच्या लक्षात येते, की या गाड्यांची काही स्पर्धा वगेरे नव्हती, तर त्यांचे उद्‍घाटन होणार होते, आता बोला!

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

कुत्र्यालाही पेताड माणसं नाही आवडत

एका मालकाने कुत्र्याच्या पिल्लाला जिवापाड जपत लहानाचे मोठे केले. दररोजचं खानं, अंघोळ, फिरवून आणणे यावर दरमहा हजारो रुपये खर्च केला जात होता. मालक आणि कुत्रा यांचे संबंधही मित्रासारखेच होते.

कधी कधी एकमेकांचे पापेपण घ्यायचे. एक दिवस रात्री मालक प्रमाणापेक्षा जास्तच दारू पिऊन घरी आले. गाडीतून उतरताच भेलकंड्या मारू लागले. कशाचा तरी आधार घेतल्याशिवाय चालणे मुश्किल झाले होते.

पुढे कोण- काय काहीच कळत नव्हते. रात्री त्यांचा कुत्रा हा मोकळा सोडला होता. मालक ओळखू न आल्याने तो मालकावरच जोरजोरात भुंकत होता. जोरजोरात धावून गेल्यावर मालकही चिडले. तेही कुत्र्याला शिव्या देऊ लागले.

दोघांचे पटेनासे झाले. जरा वेळ झाल्यावर मालक कसेबसे घरात पोचले. त्या वेळी तो कुत्राही घरात आला. मालकाने शिव्या हासडत, कारे मला नाही का ओळखत तू? माझ्यावर भुंकतोस. तुला लाज नाही का वाटत? असं म्हणत मालक कुत्र्याजवळ गेले.

मायेने कुत्र्याच्या पाठीवरू हात फिरविला आणि कुत्र्याची पप्पी घ्यायला तोंड पुढे नेले, तोच त्या कुत्र्याने मालकाच्या तोंडाचा व नाकाचाच चावा घेतला.

रक्तबंबाळ झालेल्या मालकाला रात्रीचेच दवाखान्यात न्यावे लागले. आता लाडक्या कुत्र्याने चावा का घेतला, याविषयी तर्कवितर्क काढला जात आहे. एकाने कुत्रा आहे तो, त्यालाही पेताड माणसे आवडत नसावेत, असे सांगत त्यावर कडी केली.

केंद्रीय मंत्र्यांचे ‘नेक्स्ट’...

केंद्रीय असो वा राज्याचा मंत्री असो, ते आले म्हणजे त्यांना भेटण्यासाठी, आपल्या समस्या त्यांच्यापर्यंत पोचविण्यासाठी गर्दी होतेच. रविवारी असेच एक केंद्रीय मंत्री नाशिक शहराच्या सीमेवर आले होते.

सीमेवरच्याच एका हॉटेलमध्ये चहापानाचा आणि निवडक व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये छोटेखानी कार्यक्रम होता. ते ज्या खात्याचे मंत्री होत, त्या खात्याशी संबंधित शासकीय अधिकारी जातीने हजर होतेच.

शिवाय, पक्षाचे कार्यकर्त्यांची हजेरी होतीच. भेटण्यासाठी आलेल्या हातांमध्ये मंत्री महोदयाला देण्यासाठी निवेदने होती. प्राथमिक चर्चा आटोपल्यानंतर मंत्र्यांना भेटून आपले निवेदन आणि समस्या सांगण्यासाठीची लगबग सुरू झाली. मंत्री महोदयाच्या एका बाजूला दोन खुर्च्या मांडण्यात आल्या.

त्यावर निवेदन देणारे येऊन बसले की ते आपले म्हणणे वा समस्या मंत्री महोदयाला सांगत. दोन-चार वाक्य झाल्यानंतर मंत्री महोदयाला त्या समस्येचे आकलन झाले, की निवेदन हातात घेत ‘नेक्स्ट’ असे ते म्हणत.

त्यावरून बसलेला आपल्या समस्या अर्धवट सोडून उठून जायचा. पुढचा व्यक्ती निवेदन घेऊन बसला, की पुन्हा तेच ‘नेक्स्ट’. असे करत करत त्यांनी सात-आठ जणांना अवघ्या दहा मिनिटांत कटविले. मात्र, निवेदन देणाऱ्यांचे खरेच समाधान झाले असेल का, हे मात्र त्यांनाच ठाऊक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT