admissions process esakal
नाशिक

Nashik 11th Admission : अकरावी प्रवेशाची अखेरची संधी; आजपासून सातव्‍या विशेष फेरीच्‍या प्रक्रियेला सुरवात

सकाळ वृत्तसेवा

Nashik 11th Admission : इयत्ता अकरावीच्‍या प्रवेशासाठी आणखी एक व अखेरची संधी विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने उपलब्‍ध केली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्‍या प्रक्रियेअंतर्गत सातव्‍या विशेष फेरीची प्रक्रिया बुधवार (ता. ११) पासून सुरू होत आहे. दहावी उत्तीर्ण, तसेच एटीकेटी तत्त्वास पात्र विद्यार्थीदेखील या फेरीत सहभागी होऊन प्रवेश घेऊ शकणार आहेत. (Nashik 11th Admission process of seventh special round starts from today news)

नाशिक महापालिका क्षेत्रातील ६६ कनिष्ठ महाविद्यालयांकरिता यापूर्वी तीन नियमित फेऱ्या व सहा विशेष फेऱ्यांची प्रक्रिया पार पडली आहे. ऑनलाइन केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेला विद्यार्थ्यांचा आत्तापर्यंत चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आत्तापर्यंत प्रवेशापासून वंचित राहिलेल्‍या विद्यार्थ्यांना संधी देण्याच्‍या हेतूने अंतिम व सातवी विशेष फेरी राबविली जाते आहे.

शिक्षण विभागाने जाहीर केलेल्‍या वेळापत्रकानुसार बुधवारपासून तर शुक्रवार (ता. १३) या कालावधीत इच्‍छुक विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग एक भरणे, तसेच महाविद्यालय पसंतीक्रमासाठी आवश्‍यक असलेला अर्जाचा भाग दोन भरायचा आहे.

या फेरीची गुणवत्तायादी १६ ऑक्‍टोबरला सकाळी दहाला प्रसिद्ध केली जाणार आहे. निवड झालेल्‍या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १७ ऑक्‍टोबरपर्यंत मुदत दिली जाईल.

या वर्षी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य, या सूत्रानुसार प्रक्रिया होणार नसून, ही फेरी विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची अंतिम संधी असणार आहे, असेही शिक्षण विभागाने जारी केलेल्‍या सूचनापत्रात नमूद केले आहे. यापूर्वीच्‍या प्रक्रियेत प्रवेश रद्द झालेले, प्रवेश अर्ज बाद ठरलेले किंवा इतर कुठल्‍याही विद्यार्थ्यांना सहभागी होऊन आपला प्रवेश निश्‍चित करता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीत भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, सहा वारकरी जखमी

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT