11th Admission
11th Admission esakal
नाशिक

Nashik 11th Admission : दुसऱ्या विशेष फेरीत 931 विद्यार्थ्यांची निवड; 500 विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश

सकाळ वृत्तसेवा

Nashik 11th Admission : इयत्ता अकरावीत प्रवेशासाठी राबविलेल्‍या दुसऱ्या विशेष फेरीसाठी गुणवत्तायादी शुक्रवारी (ता. ४) सकाळी दहाला प्रसिद्ध करण्यात आली. दिवसभरात ५०४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांना शनिवार (ता. ५) पर्यंत प्रवेश घेण्याची संधी उपलब्‍ध असणार आहे.

नाशिक महापालिकाक्षेत्रातील ६६ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविली जाते आहे. (Nashik 11th Admission Selection of 931 students in second special round news)

शिक्षण विभागाने तीन नियमित फेऱ्या व एक विशेष फेरी यापूर्वी राबविलेली आहे. यानंतरही रिक्‍त राहिलेल्‍या ११ हजाराहून अधिक जागांवर प्रवेशासाठी दुसरी विशेष फेरी घेण्यात आली. या फेरीसाठी शुक्रवारी गुणवत्तायादी जाहीर केली.

या फेरीसाठी ९ हजार ४०४ जागा रिक्‍त असताना, १ हजार १० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. यातून ९३१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्‍यापैकी दिवसभरात ५०४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

विज्ञान शाखा प्रवेशासाठी धडपड

प्रवेशाच्‍या पाचव्‍या फेरीतही विज्ञान शाखेत प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. दुसऱ्या विशेष फेरीत निवड झालेल्‍या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक ४३१, त्‍यापाठोपाठ वाणिज्‍य शाखेसाठी २६४, कला शाखेसाठी १९९ विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. निवड झालेल्‍यांमध्ये ८५४ विद्यार्थ्यांना त्‍यांच्‍या प्रथम प्राधान्‍याचे महाविद्यालय मिळालेले आहे.

रिक्‍त जागांचे काय?

अद्यापही मोठ्या संख्येने जागा रिक्‍त आहेत. पाच प्रवेश फेऱ्या पूर्ण झालेल्‍या असताना अद्यापही नियमित व कोट्यांतर्गत अशा दहा हजारांहून अधिक जागा रिक्‍त आहेत. दुसऱ्या विशेष फेरीची मुदत संपल्‍यानंतरही रिक्‍त राहिलेल्‍या जागांवर पुढे कुठल्‍या स्वरूपाची प्रक्रिया राबविली जाते, याकडे लक्ष लागून राहणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT