School  esakal
नाशिक

Nashik News : जिल्हास्तरीय निपुणोत्सव कार्यक्रमात 15 शाळा व शिक्षकांचा सहभाग

Nashik : शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून जिल्हास्तर निपुण महोत्सवांतर्गत गुरुवारी (ता. २८) शासकीय कन्या शाळा, नाशिक येथे जिल्हास्तरीय निपुणोत्सव कार्यक्रम घेण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून जिल्हास्तर निपुण महोत्सवांतर्गत गुरुवारी (ता. २८) शासकीय कन्या शाळा, नाशिक येथे जिल्हास्तरीय निपुणोत्सव कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हास्तरीय निपुणोत्सवात जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये प्रथम क्रमांक विजेत्या शैक्षणिक साहित्यधारक १५ शाळा व शिक्षकांनी सहभाग घेतला. शासकीय कन्या शाळेत गुरुवारी (ता. २८) जिल्हास्तरीय निपुणोत्सव कार्यक्रम झाला. (Nashik 15 schools and teachers participated in district level Nipunotsav program)

जिल्हास्तरीय निपुणोत्सवात १५ तालुक्यांच्या शैक्षणिक साहित्य व नावीन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरणाचे अवलोकन करण्यासाठी जिल्ह्यातील आदर्श शाळांचे मुख्याध्यापक, निवडक विषय साधन व्यक्ती, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी व सर्व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.

या वेळी विद्या समीक्षा केंद्र (पुणे) येथील राजेश कोरडे यांनी निपुण भारत अभियानात विद्या समीक्षा केंद्रांची भूमिका यावर ऑनलाइन मार्गदर्शन केले. डाएट अधिव्याख्याता रंजना लोहकरे यांनी निपुण भारत अभियान अंमलबजावणीत शिक्षक व अधिकारी यांच्या भूमिकेबाबत मार्गदर्शन केले.

या वेळी उपस्थित शिक्षक व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अनिल गौतम, उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, धनंजय कोळी उपस्थित होते.

या वेळी निपुण भारत रांगोळी व निपुण भारत सेल्फी पॉइंट आणि मतदान जागृती सेल्फी पॉइंट यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सुनील दराडे यांनी सूत्रसंचालन केले. यशस्वीतेसाठी अनिता देशमुख, शैलेश तवर, सोमनाथ भाबड, यशवंत रायसिंग आदींनी परिश्रम घेतले.

निफाड प्रथम

निपुण भारत शैक्षणिक साहित्य स्टॉल स्पर्धेचा निकाल या वेळी घोषित करण्यात आला. निफाडने प्रथम क्रमांक पटकावला. सुरगाणा द्वितीय, तर सिन्नरने तृतीय क्रमांक मिळविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

SCROLL FOR NEXT