Urdu Language Learning esakal
नाशिक

Nashik: शहरातील 737 मराठी भाषिकांनी उर्दू केली आत्मसात! वरिष्ठ अधिकारी, साहित्यिक, डॉक्टरांसह सामान्य नागरिकांचा समावेश

Urdu Language : शहरातील सारडा सर्कल येथील नॅशनल उर्दू हायस्कूल येथे १९ वर्षापासून केंद्र चालविले जात आहे.

- युनूस शेख

जुने नाशिक : गेल्या १९ वर्षात शहरातील ७३७ मराठी भाषिकांनी उर्दू भाषेचे धडे गिरविले. यामध्ये पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी, साहित्यिक, डॉक्टरांसह सामान्य नागरिकांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ ६६७ मुस्लिम बांधवांनी उर्दू भाषा (Urdu Language) आत्मसात केली. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयातर्फे देशभरात विविध ठिकाणी उर्दू भाषा शिकविण्याचे केंद्र चालविले जातात. शहरातील सारडा सर्कल येथील नॅशनल उर्दू हायस्कूल येथे १९ वर्षापासून केंद्र चालविले जात आहे. (Nashik latest marathi News)

२००५ मध्ये या ठिकाणी एक वर्षाचा उर्दू भाषिक कोर्स सुरू करण्यात आला. १९ वर्षात विविध भाषिकांनी केंद्रात उर्दू भाषेचे धडे गिरविले. उर्दू भाषेची आवड, उर्दू साहित्यातील रस तसेच शासकीय कामानिमित्ताने उर्दू भाषा अवगत असणे आवश्यक आहे. पोलिस विभागास जनसंपर्कासाठी अतिशय उपयुक्त भाषा आहे.

अशा विविध कारणांनी अनेक जण केंद्रात प्रवेश घेत उर्दू भाषेचे ज्ञान आत्मसात करतात. १९ वर्षात १ हजार ४०४ जणांनी उर्दू शिकण्यासाठी प्रवेश घेतले अन् उत्तीर्ण झाले. त्यात सर्वाधिक ७३७ मराठी भाषिक अर्थात हिंदू बांधवांनी तर ६६७ मुस्लिम बांधवांनी उर्दू भाषेचे धडे घेतले.

त्यात डॉक्टर, न्यायाधीश, बँक, शासकीय कार्यालय, पोलिस विभाग यास अन्य विविध विभागातील अधिकारी कर्मचारी तसेच सामान्य नागरिकांचा समावेश आहे. सर्व भाषिक एकत्र शिक्षण घेत असल्याने या ठिकाणी धार्मिक एकतेचे आणि सलोख्याचे दर्शन घडून येत आहे.

शासकीय कामकाजात या शिक्षणाचा मोठा उपयोग झाल्याच्या प्रतिक्रिया अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आल्या. यंदा ७८ जन शिक्षण घेत आहे. त्यात ३० मुस्लिम तर ४८ हिंदू भाषिकांचा समावेश आहे.

यांनी गिरविले उर्दूचे धडे

सुनील कडासने (पोलिस अधिकारी), स्वाती कुऱ्हाडे (पोलिस अधिकारी), विश्वास ठाकूर (बँकिंग क्षेत्र), सतीश करंदीकर (शिक्षण क्षेत्र), श्रीराम तोशी (वैज्ञानिक), अतुल भोसेकर (मोडी लिपी वाचक), डॉ. जयंत सोनी (वैद्यकीय), सूर्यकांत पवार (वीज वितरण अभियंता), विलास प्रधान (उद्योजक), राजेश जुन्नरे (वकील), सुधीर देशपांडे (न्यायाधीश), डॉ. प्रसाद कुलकर्णी (संस्कृत भाषा तज्ञ), हेमलता पाटील (नगरसेविका) (Latest Marathi News)

२५ तारखेपर्यंत मुदत

या वर्षी उर्दू शिक्षणासाठी इच्छुक असणाऱ्या व्यक्तींना २५ तारखेपर्यंत शिक्षण घेता येणार आहे. या वर्षासाठी पोलिस उपनिरीक्षक हसन सय्यद यांच्या संपूर्ण कुटुंबाने उर्दू शिक्षणासाठी प्रवेश घेतला. तसेच औरंगाबाद, पुणे, नाशिक, मुंबई, ठाणे, वैजापूर, इचलकरंजी आणि दिंडोरी अशा विविध शहरांमध्ये न्यायाधीश असलेले तसेच कायदेतज्ज्ञ, कायदे साहित्यिक अनिल वैद्य यांनीदेखील प्रवेश घेतला आहे.

त्यांच्या कायद्या नावाच्या पुस्तकाच्या १५ आवृत्ती प्रसिद्ध झाल्या आहे. ॲट्रॉसिटी ॲक्ट पुस्तकाच्या ११ प्रती अशा विविध पुस्तकांच्या सुमारे १७ पुस्तके प्रसिद्ध झाले आहे. उर्दू भाषेची आवड, उर्दू साहित्य अवगत करण्याची इच्छा यासाठी त्यांनी प्रवेश घेतला असल्याचे केंद्रप्रमुख लियाकत पठाण यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT