Farmer showing the nutmeg tree in the field Dashrath tree and Manisha tree.
Farmer showing the nutmeg tree in the field Dashrath tree and Manisha tree.  esakal
नाशिक

Nashik Agricultural Success: परदेशवाडीतील पती-पत्नीने फुलवली नैसर्गिक मिश्रशेती! झाडे दांपत्यांचा यशस्वी प्रयोग

विजय पगारे

इगतपुरी : बदललेले निसर्गचक्र, पर्यावरणाच्या असमतोलाचा मानवी जीवनावर विपरित परिणाम होतोय. नैसर्गिक शेती करणे काळाची गरज समजून खेडभैरव (परदेशवाडी) येथील शेतकरी दशरथ झाडे, त्यांची पत्नी मनीषा झाडे यांनी शासकीय नोकरी झुगारून देऊन काळ्या आईची सेवा करण्यासाठी तीन वर्षांपासून नांगरणी न करता मिश्रशेतीचा प्रयोग केलायं. (Nashik Agricultural Success natural mixed farming marathi news)

परदेशवाडीतील मनीषा झाडे व दशरथ झाडे हे सुशिक्षित जोडपे विविध पुस्तकांचे वाचन करून नैसर्गिक शेती करतात. त्यांनी शेतीत आंतरपीक पद्धतीचा अवलंब केला आहे. बिजामृत, जीवामृत, वापसा, अच्छादनानुसार ताकाची फवारणी करून विविध मिश्रपिके घेतली आहेत.

दोन एकरात मिश्र पिकांत सात फुटाचे अंतर ठेवून दालचिनी, तेजपत्ता, सफरचंद, केळी, जायफळ, कोकम आंबे, कॉफी, लिची, अननस, अद्रक, हळद, संत्री व मोसंबी आदी पिके आहेत. शेतीसाठी घनजीवामृत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, निंबोळी पावडर, निम ऑइल वापरतात. (latest marathi news)

सोनमोती गहू, इंद्रायणी तांदूळ, खपली गहू, हातसडीचा तांदूळ, खुरसणी विक्री करतात. देशी गाय, देशी बियाणे वापर करतात. श्री किसान मंचची स्थापना केली असून, अनेक डेमो प्लॉट पाहण्यासाठी व शेती शिकण्यासाठी शेतकरी येतात. ज्वारीचा चिवडा, जवस मुखवास, मिक्स जवस मुखवास, जंगली मध, उडदाचे सूप, कुळदाचे सूप आदी वस्तू घरी बनवून त्याची मुंबईला विक्री करण्यात येते.

"कार्बन उत्सर्जनामुळे जागतिक तापमानात मोठी वाढ होत आहे. यामुळे माणसाचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्यासाठी किमान आपल्या आरोग्यासाठी नैसर्गिक शेती करणे गरजेचे आहे. जुने ते सोने यावर भर दिल्यास लोकांचे कल्याण होईल. ‘आमची माती आमची माणसे’ हा कार्यक्रम, विविध शेतीची पुस्तकांतून शेती करण्याची प्रेरणा मिळाली."

- मनीषा झाडे, महिला शेतकरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT