Rough pruning of grape vines in Ravindra Borgude's farm recently.
Rough pruning of grape vines in Ravindra Borgude's farm recently.  esakal
नाशिक

Nashik Grapes News: द्राक्षवेलींच्या एप्रिल खरड छाटणीस प्रारंभ! चालू हंगाम आर्थिकदृष्ट्या गोड झाल्याने पुढील हंगामासाठी उत्साह

सकाळ वृत्तसेवा

नैताळे : निफाडच्या द्राक्ष पंढरीत द्राक्ष काढणीचा हंगाम जोरात सुरु आहे. ज्या द्राक्ष उत्पादकांची द्राक्षवेली खाली झाली अशा शेतकऱ्यांनी द्राक्ष वेलींच्या एप्रिल खरड छाटणीला सुरवात केली आहे. द्राक्ष काढणीनंतर सर्वसाधारणपणे १५ दिवसांनी किंवा एप्रिलच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यामध्ये खरड छाटणी केली जाते. (Nashik April pruning of grape vines started news)

द्राक्ष बागेतल्या फळ छाटणी अवस्थेअगोदर सर्वात महत्त्वाची अवस्था म्हणजे खरड छाटणी अवस्था. कारण जर खरड छाटणी व्यवस्थापन योग्यरीत्या झाले तरच फळ छाटणी व्यवस्थापनाला महत्त्व आहे. द्राक्षातील खरड छाटणीस फळ (गोडीबहर) छाटणीचा पाया असेही म्हणतात. एप्रिल महिन्यात खरड छाटणीनंतर बागेची योग्य ती काळजी घेतली तरच चांगल्याप्रकारे काड्यांची निर्मिती होते. काडी फळधारणा युक्त असेल तरच फळछाटणी महत्त्वाची आहे.

यात खरड छाटणीनंतर फुटून आलेल्या नवीन फुटीतील योग्य ती फूट राखणे, अतिरिक्त फुटींची विरळणी करणे, दोन (फांद्या) काड्यांमधील योग्य अंतर राखणे, वेळेवर सबकेन करणे, सबकेनच्या पुढील शेंडा योग्य वेळी मारणे, काडीवरिल पानांची संख्या नियोजन करणे, अन्नद्रव्यांचा व्यवस्थित पुरवठा करणे, वेलीस रोग व कीड यापासून नियंत्रणात ठेवणे, काडी पक्वता निर्मिती योग्य नियोजन करणे यासारख्या अनेक महत्त्वाच्या घटनांचा समावेश होतो. (latest marathi news)

द्राक्षवेलींच्या काड्यांची परिपक्वता होण्यासाठी खरड छाटणीपासून साधारणतः १४० ते १५० दिवसांचा कालावधी लागतो. खरड छाटणीनंतर बागेत सुप्त घड निर्मितीसाठी व त्यांच्या विकासासाठी आवश्यक असे पोषक वातावरण निर्माण होणे गरजेचे असते.

"द्राक्ष काढणी आटोपल्यानंतर साधारणतः १५ दिवस द्राक्षवेलींना विश्रांती द्यावी लागते. नंतर खरड छाटणीला प्रारंभ होतो. या काळात झाडांच्या बुडाजवळ शेणखत घालणे, द्राक्षबागेतील अंतर्गत मशागत करणे, फ्लडने पाणी देणे, अशी कामे केली जातात."

-किशोर बोरगुडे, द्राक्ष उत्पादक नैताळे

"द्राक्ष काढणीनंतर शेतकरी दुसऱ्या हंगामाची तयारी करतो. ३ हजार रुपये एकरी खर्च करून खरड छाटणी मजुरांकडून करून घेतली जाते. त्यानंतर फुटवा केल्यानंतर २ हजार रुपये काडी विरळणी, अडीच हजार रुपये सबकेन करणे, ३ हजार रुपये बगल फूट काढणे, २ हजार रुपये शेंडा स्टॉप करणे, अशी एकरी रक्कम देत द्राक्षेवेलींची कामे केली जातात.:"

- रवींद्र बोरगुडे, द्राक्ष उत्पादक-नैताळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT