Watermelon intercrop planted with chilli crop by Dattu Borse here.
Watermelon intercrop planted with chilli crop by Dattu Borse here. esakal
नाशिक

Nashik Agriculture News : पाण्याच्या नियोजनातून फुलली मिरचीची शेती; टरबुजाचे आंतरपीक घेत साधली उत्पन्नाची किमया

सकाळ वृत्तसेवा

Nashik Agriculture News : मिरचीच्या पिकात टरबुजाचे आंतरपीक घेऊन अवघ्या तीन महिन्यांत दोन लाखांचे उत्पन्न घेतले. आणखी दोन महिन्यांपर्यंत तीन ते चार लाखांचे उत्पन्न होणार असल्याने तब्बल पाच लाख रुपयांचे उत्पादन घेण्याची किमया खामखेडा येथील शेतकरी दत्तू बोरसे यांनी साधली आहे. शेतकरी दत्तू देवमण बोरसे यांनी उन्हाळ कांद्यासोबतच पाणी कमी असल्याने दीड एकर क्षेत्रावर ज्वेलरी जातीच्या मिरचीची १ जानेवारीला लागवड केली होती. (Nashik Agriculture Chilli farming flourished through water planning in khamkheda marathi News)

मिरची लागवडसाठी मल्चिंग व ठिबक केल्याने त्यांनी यात आंतरपीक म्हणून टरबुजाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यात त्यांनी रसिका जातीच्या टरबुजाची लागवड केली. एक एकर क्षेत्रासाठी मिरचीची ६ हजार व टरबूजाची साढे सहा हजार रोपे लागवड केली. दोन्ही पिकांची योग्य मशागत व निगा राखल्याने दोन महिन्यांतच टरबूजाचे पिक काढणीला आले.

एक एकर क्षेत्रात २० टन टरबुजाचे उत्पन्न मिळाले. अकरा रुपये दराने टरबूज दिल्याने यातून त्यांना दोन लाख वीस हजार रुपयांचे उत्पादन मिळाले. तीन महिन्यांनंतर मिरचीचा पहिला तोडा करून दीड टन निघाला. ही मिरची खामखेडा व मालेगाव येथील बाजारपेठेत विक्री केली.

यातून त्यांना पहिल्या तोड्याला साधारणता ५३ रूपये सरासरी दर मिळाला. पहिल्याच तोड्यात त्यांना ऐंशी हजार रुपये मिळाले. आणखी दीड ते दोन महिन्यांपर्यंत मिरचीचे तीन ते चार तोडे होतील. यात त्यांना अजून दहा टन मिरचीचे उत्पादन होईल अशी आशा आहे. यातून त्यांना सरासरी ४० रूपये बाजारभाव मिळाला तरी साडे तीन ते चार लाखांचे उत्पादन मिळणार आहे.(latest marathi news)

पाण्याचा सुयोग्य वापर

विहिरीने तळ गाठल्याने पाण्याचे योग्य नियोजन करत काटकसरीने वापर करून आंतरपिकाचा प्रयोग केला. दोन्ही पिकातून लागवडीचा खर्च व मजूर खर्च वजा जाता त्यांना एक एकर क्षेत्रातून पाच ते सहा लाखांचे उत्पादन मिळणार आहे.

''मी कृषी पदवीधारक असून शेतीत प्रयोग केले तरच उत्पन्न मिळू शकते. कुटुंबीयांनी सुयोग्य नियोजन केल्याने आंतर पिकातून कमी खर्चात चांगले उत्पादन मिळवू शकलो.''- तुषार दत्तू बोरसे, शेतकरी, खामखेडा.

दोन्ही पिकांचा खर्च

एक एकर क्षेत्रासाठी ६ हजार रोपे १ रूपये २० पैसे दराने व टरबूजाची साडेसहा हजार रोपे दीड रुपये दराने खरेदी केली. रोपांसाठी अठरा हजार खर्च, मल्चिंग व ठिबकसाठी बारा हजार रुपये खर्च आला. शेणखत व रासायनिक खते व फवारणी असा ३० हजार रूपयांचा खर्च झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT