Nashik Agriculture News
Nashik Agriculture News  esakal
नाशिक

Nashik Agriculture News : कलिंगड पिकाकडे तरुणांचा कल; स्थानिक उत्पादनाला परराज्यांत अधिक मागणी

सकाळ वृत्तसेवा

विकास गिते : सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : एकीकडे दोन वर्षांपूर्वी कोविडने धुमाकूळ घातलेला असताना अनेकांचे व्यवसाय हे असून नसल्यासारखे झाले, अशा आपबीती काळात अनेकांच्या नोकऱ्या, शेतकरी पिकांबरोबरच व्यवसायावर चालणारे उद्योगधंदे बंद पडले. पण त्याच वेळी सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना काही नव्या संधी खुल्या झाल्या. भाजीपाला ही मूलभूत गरजा असून, शेतकरी हाच खरा अन्नदाता आहे आणि कृषी क्षेत्रात रोजगारांच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत, हे याच काळात अधोरेखित झाले. याच संधीचा फायदा घेत सिन्नर तालुक्यातील उच्चशिक्षित तरुण प्रवीण वामने व शेतकरी वर्ग यांनी एकत्र येत कलिंगड पीक घेऊन शेती व्यवसायातून काय मिळू शकते हे सर्वांना दाखवून दिले.

या वर्षी अतिवृष्टीने होत्याचे नव्हते केले होते. अशा वेळेस काही महिन्यांपूर्वी पाऊस थांबताच सिन्नर तालुक्यात कलिंगड पिकाची लागवड सुरू झाली आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातून नियोजन करून हे पीक घेतले जात असल्याने शेतकऱ्यांसाठी ते फायदेशीर ठरू लागले आहे.

हेही वाचा : दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

सिन्नर तालुक्यात पारंपरिक शेती होत असताना आज नव्याने शेतकऱ्यांनी शेतात प्रयोग करण्यास सुरवात केली आहे. यामध्ये कडधान्य, भाजीपाला, विविध प्रकारचे फळे यांची लागवड केली जात आहे. तालुक्यात डुबेरे येथील वामने बंधू व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने कलिंगड पीक मोठ्या प्रमाणात घेण्यास सुरवात केली. कलिंगड पिकाला व्यावसायिक रूप दिले. आज वामने बंधूंसह तालुक्यातील अन्य शेतकरी कलिंगड पिकाकडे वळू लागले आहेत.

शेतकऱ्यांचा कलिंगडाकडे वाढला कल

योग्य नियोजन, बाजारपेठ यामुळे आज तालुक्यात शेतकऱ्यांना कलिंगड हे पीक फायदेशीर ठरत आहे. तालुक्यात सोमठाणे, देवपूर, फरदापूर, निमगाव, मेंढी, डुबेरे, पंचाळे, मिठसागरे, वावी, सोनारी, कोनांबे, सोनांबे, पांढुर्ली आदी भागात कलिंगड पीक घेतले जात आहे. या वर्षी कलिंगड पिकाची लागवड सुरू झाली आहे. कलिंगड लागवडीसाठी लागणारे ब्लिचिंग पेपर, बियाण्यांसह पीक लागवडीसाठी लागणारे साहित्य खरेदी करताना दिसत आहेत. तालुक्यातील डुबेरे येथील वामने बंधूंसह तेथील शेतकरी कलिंगडचे पीक घेतात. स्थानिक व परराज्यांत मागणी मोठ्या प्रमाणात मिळते. त्यामुळे कलिंगड पिकाच्या माध्यमातून आज शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षमपणे उभा राहताना दिसत आहे.

''कलिंगड पीक साधारणतः पूर्वी नदीच्या कडेला घेतले जायचे; परंतु सध्या हे पीक सर्वत्र होताना दिसत आहे. मुरमाड व हलक्या जमिनीत हे पीक चांगले येते. कलिंगड पीक आमच्या पंचक्रोशीत पहिल्यांदा मी घेतले. लॉकडाउनमध्येसुद्धा या पिकातून मला चांगले आर्थिक उत्पन्न मिळाले. कलिंगड लागवडीचे प्रमाण आमच्या पंचक्रोशीमध्ये वाढत आहे. पिकाचचे विक्री व्यवस्थापन यशग्रामच्या माध्यमातून आम्ही करत आहोत.'' - प्रवीण वामने, यशग्राम प्रगतशील शेतकरी डुबेरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 DC vs LSG Live Score: अर्धा संघ माघारी परतला, पण पुरनची एकाकी झुंज; अवघ्या 20 चेंडूत झळकावलं अर्धशतक

Ghatkopar hoarding : 'जीव वाचला पण रोजी रोटी गेली'; गंभीर जखमी झालेले टॅक्सी चालक सुभेदार मोर्या यांची व्यथा

Table Tennis: मनिका बत्राने रचला इतिहास! 'असा' पराक्रम करणारी बनली पहिलीच भारतीय महिला टेबल-टेनिसपटू

PM Modi: ना घर, ना जमीन; पंतप्रधान मोदींची किती आहे संपत्ती? शपथपत्रातून आलं समोर

IND W vs SA W: भारत दौऱ्यावर येणार दक्षिण आफ्रिका संघ! BCCI ने केली शेड्युलची घोषणा, पाहा कधी आणि केव्हा होणार सामने

SCROLL FOR NEXT