Dewdrops on the grape crop esakal
नाशिक

Nashik Agriculture Update : लासलगावसह परिसरात दाट धुक्याची चादर; दवबिंदूमुळे द्राक्षांना बसणार फटका

सकाळ वृत्तसेवा

लासलगाव : सोमवारची (ता. ३०) पहाट गुलाबी थंडी अन् दाट धुके असे मनमोहक दृश्य लासलगाव शहर व परिसरात पाहायला मिळाले.

वाहनचालकांना धुक्यामुळे रस्ताही दिसत नव्हता. रस्त्याचा अंदाज घेत दिवे सुरू ठेऊन कांदा आणि शेतमालाने भरलेली व इतर वाहनांची वाहतूक संथगतीने सुरू होती. पाच-दहा फुटांवरील घरे, इमारती, वाहनेही धुक्यामुळे दिसत नव्हती. (Nashik Agriculture Update Thick fog cover in area including Lasalgaon Grapes will be affected by frost Nashik News)

धुक्यामुळे वाहनांचा वेगही मंदावला होता. रस्त्यावरील पथदीप अगरबत्ती सारखे दिसत होती. गुलाबी थंडी, दाट धुके आणि दवबिंदु असे मनमोहक वातावरण लासलगावकरांनी आज अनुभवले. या दाट धुक्याबरोबर दवबिंदू मोठ्या प्रमाणात असल्याने सोनाका, मानिक चमण, या तयार झालेल्या द्राक्षमण्यास तडे जाण्याची दाट शक्यता आहे.

तसेच कांदा पिकांवर ही करपा, मावा या रोगांचा प्रादुर्भाव अधिक वाढेल, अशी माहिती ब्राम्हणगाव विंचूर येथील शेतकरी सुनील गवळी यांनी दिली.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

धुक्‍याची चादर ओढून घेतलेले रस्ते आणि इमारती अशा ‘धुकेमय’ वातावरणाची अनुभूती लासलगावकर घेत आहेत. पहाटेच्या वेळी दाट धुक्‍याची चादर शहरावर ओढल्याचे मनमोहक दृश्‍य पाहायला मिळाले. शहराच्या विविध भागांत सकाळी धुके पडले. पहाटे धुक्‍याचे सौंदर्य डोळ्यांत साठविण्यासाठी पर्यावरणप्रेमी आणि कॅमेऱ्यात टिपण्यासाठी हौशी छायाचित्रकार बाहेर पडू लागले आहेत. व्यायामासाठी घराबाहेर पडणारी मंडळीही धुक्‍याचा मनमुराद आनंद लुटत असल्याचे पाहायला मिळते.

या धुक्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. द्राक्षाला तडे जाण्याची भीती निर्माण झाली असून, कांद्याला करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती निर्माण झाली आहे, त्यातच आर्थिक बजेट सावरणाऱ्या भाजीपाल्यावर या वातावरणाचा परिणाम होणार असून शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोसळणार आहे. त्यामुळे महागडी औषधे फावारुन कसेबसे पिके वाचवण्याचा शेतकरी आटोकाट प्रयत्न करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील नांदणी तपासणी नाक्यावर लाच घेणारा आरटीओ निरीक्षक व खासगी व्यक्ती रंगेहाथ सापडला, ड्रॉव्हरमध्ये किती रुपये, वाचा...

Islapur News : बँकेच्या कर्जाला कंटाळुन एका शेतकऱ्याने गळफास घेऊन संपविले जीवन

Vehicle Fitness Test: आरटीओची मोठी डिजिटल झेप! ६ मिनिटांत वाहनांची फिटनेस तपासणी करणार, नवीन प्रणाली कधी लागू करणार?

Pune BJP leads in campaign : पुण्यात भाजपचा प्रचाराचा धडाका!, महापालिका निवडणुकीसाठी जबरदस्त नियोजन

Ajit Pawar: धनंजय मुंडेंना पुन्हा संधी! राष्ट्रवादीची यादी जाहीर; नेत्यांची संपूर्ण लिस्ट पाहा

SCROLL FOR NEXT