Anna Bhau Sathe & Traffic Police esakal
नाशिक

Nashik News: लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्ताने उद्या मिरवणूक! शहरातील वाहतूक मार्गात बदल; पर्यायी मार्गांचा करावा अवलंब

Nashik Traffic Route Change : वाहतूक शाखेतर्फे मिरवणूक मार्गावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून तसे आदेश वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी जारी केले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शाहीर अण्णा भाऊ साठे यांची उद्या (ता.1) जयंती असून यानिमित्ताने शहरातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात येते. जयंती मिरवणुकीमुळे वाहतूकीला अडथळा निर्माण होऊन समस्या निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे वाहतूक शाखेतर्फे मिरवणूक मार्गावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून तसे आदेश वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी जारी केले आहेत. (Anna Bhau Sathe Jayanti procession tomorrow)

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती उद्या (ता.1) शहरभर उत्साहात साजरी केली जाणार आहे. त्यासाठी शहरातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूकही निघणार आहे. मिरवणुकीला महात्मा फुले मार्केट येथून प्रारंभ होईल. चौक मंडई, फाळके रोड, अब्दुल हमीद चौक, भद्रकाली मार्केट, बादशाही कॉर्नर, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉईंट, रविवार कारंजा, टिळकरोड, सांगली बॅंक कॉर्नर, परशुराम सायखेडकर नाट्यगृह, शालिमार, खडकाळी सिग्नल मार्गे किटकॉट कॉर्नर आणि अण्णा भाऊ साठे पुतळा येथे मिरवणुकीचा समारोप होणार आहे.

या मार्गावरून मिरवणूक निघणार असल्याने वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे गुरुवारी (ता.1) सकाळी १० वाजेपासून मिरवणूक संपेपर्यत या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मार्गाने येणाऱ्या वाहनांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा. (latest marathi news)

वाहतूक मार्गात बदल

निमाणी व पंचवटी कारंजा येथून सुटणाऱ्या शहर बसेस या पंचवटी डेपोतून सुटतील तर, दिंडोरी, पेठ, ओझरकडून नाशिककडे येणाऱ्या बसेस आडगावा नाका, कन्नमवार पुलावरून द्वारका सर्कलकडून सारडा सर्कल, गडकरी सिग्नल, सिबिएसमार्गे मार्गस्थ होतील.

तसेच, अण्णा भाऊ साठे पुतळा ते कालिदास कलामंदिर ते शिवसेना भवन हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहिल. तरी वाहतूक मार्गाचा अवलंब वाहनाचालकांनी करावा असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahaparinirvan Din: महापरिनिर्वाणदिनानिम्मीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काय म्हणाले पंतप्रधान? योगींनी शेअर केला खास video

Indigo Flight रद्द झाल्यानंतर प्रवाशांना पूर्ण पैसे परत मिळतील का? विमान कंपन्यांचे नियम काय सांगतात?

NZ vs WI 1st Test : भले शाब्बास... Justin Greaves च्या द्विशतकाने विंडीजला वाचवले, विजयाचे स्वप्न पाहणाऱ्या न्यूझीलंडला रडवले

'बोलविता धनी': हृषिकेश जोशींच्या लेखणीतील नव्या नाटकासाठी क्षितिज दाते सज्ज!

Ahilyanagar : भाजप नेत्यानं लग्नासाठी तगादा लावला, नर्तिकेनं आयुष्य संपवलं; पत्नीनं लढवलीय नगरपरिषदेची निवडणूक

SCROLL FOR NEXT